भारताचा फलंदाज केएल राहुलची 2018मधील कामगिरी हवी तशी चांगली झाली नाही. इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यामध्ये केलेल्या 149 धावा आणि एशिया कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध केलेल्या 60 धावा या दोनच सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली आहे.
राहुलची ही कामगिरी बघता त्याचे टी20 विश्वचषकातील स्थान धोक्यात आले आहे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी मांडले आहे.
टी20 विश्वचषक पुढील वर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
कॉफी विथ करन या प्रकरणामुळे संघाबाहेर गेलेल्या राहुलवरील बंदी बीसीसीआयने उठवून त्याला भारत ए संघात स्थान दिले होते. या प्रकरणात हार्दिक पंड्याही होता. मात्र त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. तर राहुलला देशांतर्गत क्रिकेटमध्ये जागा दिली गेली आहे.
त्याचबरोबर राहुलला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या 3 टी20 सामन्यासाठीही संघात जागा दिली गेली नसल्याने त्याच्या राष्ट्रीय संघात येण्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
आजच (31 जानेवारी) झालेल्या भारत ए विरुद्ध इंग्लंड लायन्स 5व्या वन-डे सामन्यात राहुलला भोपळाही फोडता आला नाही. या मालिकेतील 5 पैकी 2 सामन्यात खेळताना त्याने 47 आणि 0 अशा धावा केल्या आहेत.
राहुलने भारताकडून खेळताना 34 कसोटीमध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 1905 धावा केल्या आहेत. तर 13 वन-डे खेळताना 317 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर 25 टी20 सामन्यात 2 शतके आणि 4 अर्धशतकाच्या मदतीने 782 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–पराभवाचे कारण कर्णधार रोहित शर्माने केले स्पष्ट
–९६० वनडे खेळलेल्या टीम इंडियाच्या बाबतीत दुसऱ्यांदाच असे घडले…
–टीम इंडियाबाबतीत सातव्यांदाच घडले असे काही!