मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाला योग्य ठरवताना भारताच्या हनुमा विहारी आणि मयंक अगरवाल या नवीन सलामीवीर जोडीने 40 धावांची सलामी भागीदारी करताना चांगली सुरुवात केली.
या सामन्यात विहारी आणि अगरवाल यांची मुरली विजय आणि केएल राहुल ऐवजी सलामीवीर फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विजय आणि राहुल हे या सामन्यात पर्यायी सलामीवीर(रिझर्व ओपनर) म्हणून ड्रेसिंग रुममध्ये बसावे लागले आहे.
त्यामुळे या सामन्यात राहुल फलंदाजांसाठी पाणी घेऊन मैदानात जाताना दिसला. यामुळे एक अनोखा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.
राहुल हा क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात पर्यायी सलामीवीर राहिला असताना तो तीन्ही प्रकारात मैदानात खेळाडूंसाठी पाणी घेऊन गेला आहे. तसेच तो जेव्हा पाणी घेऊन मैदानात गेला आहे, त्यावेळी रोहित शर्मा – शिखर धवन किंवा हनुमा विहारी – मयंक अगरवाल हे सलामीला फलंदाजी करत होते.
विशेष म्हणजे क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात राहुलने किमान एकदातरी सलामीला फलंदाजी केली आहे. त्यामुळे केएल राहुल क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात सलामीवीरांना पाणी घेऊन जाणारा पहिला सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राअखेर 54.5 षटकात 2 बाद 123 धावा केल्या आहेत. भारताकडून अगरवालने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या:
–मयंक अगरवाल असा पराक्रम करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज
–पदार्पणाच्या सामन्यात शानदार अर्धशतक करणाऱ्या मयंक अगरवालने केला हा खास विक्रम
–पहिला सामना खेळणाऱ्या मयांक अगरवालने मैदानात पाय ठेवताच झाला विक्रम