भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेची सध्या क्रिकेट जगतात चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या मालिकेत भारतीय संघ तीन सामन्यांनतर २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. या मालिकेदरम्यान एका महिला अँकरची मोठी चर्चा होत आहे. ती अँकर म्हणजे किरा नारायणन.
किरा नारायणन गेल्या काही महिन्यांपासून स्टार स्पोर्ट या चॅॅनेलवर दिसत आहे. ती क्रिकेट सामन्यांच्या लाईव्ह शो दरम्यान सुनील गावसकर, ब्रेट ली, ब्रायन लारा यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. ती इंडियन प्रीमीयर लीग दरम्यानही लाईव्ह शोमध्ये अँकरींग करताना दिसली होती. त्यामुळे ती नक्की कोण आहे, याबद्दल जाणून घेऊ.
किरा नारायणनबद्दलच्या खास गोष्टी
१. किरा नारायणन मुळची चेन्नईमधील आहे. तिचा जन्म चेन्नईमध्ये २६ जानेवारी १९९४ ला झाला. तिचे वडील आयटी क्षेत्रामध्ये असून आई शिक्षिका आहे. किरा जरी मुळची चेन्नईची असली तरी तिचे बालपण मलेशियामध्ये क्वालालंपुरमध्ये गेले आहे.
२. तिला डान्स, संगीताची देखील आवड असून ती भरतनाट्यम शिकली आहे. तसेच तिला टेनिसही खेळायला आवडते. तिला गिटार आणि पियानो देखील वाजवता येतो.
https://www.instagram.com/p/CLTtmaiDQV_/
३. तिने युनिवर्सिटी कॉलेज लंडन येथून मानसशास्त्रात बीएससी केले आहे. तसेच तिने फिल्म ऍक्टिंगचा डिप्लोमा न्यूयॉर्क फिल्म ऍकेडमीमधून पूर्ण केला आहे.
४. किरा ही भारतात सर्वात आधी प्रकाशझोतात आली ते ‘अलादीन’मध्ये तिने साकारलेल्या राजकुमारी जास्मिनच्या भूमिकेमुळे.
https://www.instagram.com/p/CIVx1-kDdx2/
५. किराने तमिळ चित्रपट ‘कुठन’ यात काम केले आहे. तसेच तिने ‘मायनस वन’ या वेबसिरिजमध्येही काम केले आहे. याबरोबर ‘माय फेअर लेडी’ या नाटकातही तिने काम केले आहे. तसेच ती ग्रेट ब्रिटनच्या नॅशनल यूथ थिएटरची सदस्यही आहे.
https://www.instagram.com/p/CHkDDOxjlPw/
६. ती मागील काही वर्षापासून स्टार स्पोर्ट्सशी जोडलेली आहे. क्रिकेट शो करण्याआधी तिने प्रो कबड्डी लीगचे अँकरींग केले आहे. त्यानंतर ती क्रिकेट या खेळाकडेही वळली. त्यामुळे सध्या ती स्टार स्पोर्ट्सवर क्रिकेट सामन्यांच्या लाईव्ह शोमध्ये अँकरींग करताना दिसते.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईकर अय्यरचा फलंदाजीत बल्ले बल्ले! सलग २ सामन्यात झुंजार शतकं, आता इंग्लंडला पाजणार पराभवाचं पाणी
ब्रेकिंग! लखनऊ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा