---Advertisement---

किमपासून ते महिमापर्यंत ‘या’ अभिनेत्रींशी जोडले गेले लिअँडर पेसचे नाव; संजू बाबाच्या पत्नीचाही समावेश

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 4:36 PM
---Advertisement---

एक क्रीडाप्रेमी म्हणून जवळपास प्रत्येकालाच खेळाडूच्या मैदानातील कामगिरीबद्दलच मैदानाबाहेरील त्याच्या आयुष्यातील विविध गोष्टी जाणून घेण्यातही रस असतो. भारतातही खेळाडूंना मोठे सेलिब्रेटी समजले जाते, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सातत्याने चर्चा होत राहातात. त्यातही काही विषय असे असतात, ज्याबद्दल वर्षानूवर्षे चर्चा केली जाते. असाच एक विषय म्हणजे भारताची सर्वात यशस्वी टेनिसपटूंची जोडी लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वाद.

नुकतेच ‘इंडियन एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पेस-भूपती जोडीमधील वादावर ‘ब्रेकपाँइंट’ ही एक सिरिज ‘झी5′ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली. या सिरिजमधून मोठे यश मिळाल्यानंतरही या दोन यशस्वी खेळाडूंमध्ये वाद नक्की कोणत्या गोष्टीमुळे झाले, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या सिरिजमुळे पुन्हा एकदा पेस आणि भूपती यांच्याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. त्यातही पेस त्याच्या मैदानातील यशाबरोबरच मैदानाबाहेरील त्याच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला. त्याच्या लव्ह-लाईफबद्दल नेहमीच बोललं जातं. काही जणांचं तर, असंही मत होतं की याच गोष्टीमुळे पेस आणि भूपती वेगळे झाले. दरम्यान, याच संदर्भातील एक किस्साही’ब्रेकपाँइंट’ या सिरिजमध्ये ऐकायला मिळतो.

त्या किस्स्यानुसार 1999 सालच्या फ्रेंच ओपननंतर या दोघांनी अनेक गैरसमजांमुळे आपले मार्ग वेगळे केले. त्यांच्या या निर्णयाचा त्यांच्या खेळावरही परिणाम होत असल्याने त्यांचे प्रशिक्षकही नाराज होते. त्यामुळे, पुढीलवर्षीच्या फ्रेंच ओपनवेळी पेसच्या प्रशिक्षकांनी त्या दोघांना एका रिकाम्या खोलीत त्यांच्यातील वाद संपवण्यासाठी पाठवले.

यावेळी त्या दोघांनी एकमेकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. पण, पेसने भूपतीला एक प्रश्न विचारला की ‘अशी चर्चा होत आहे की महेश माझ्या गर्लफ्रेंडच्या खूप जवळ आला आहे.’ त्यावेळी महेशने पेसला पुन्हा प्रश्न विचारला, ‘तू खरंच गंभीरपणे विचारतोय का? तूला मी असं काही करु शकतो यावर खरंच विश्वास आहे का?’ त्यावर पेसने हो, असे उत्तर देताच महेशने आता काही बोलण्यासारखे नाही, असे म्हणत खोलीतून निघून जाणे पसंत केले होते. असे असले तरी पुढे जाऊन पुन्हा या दोघांनी एकत्र येत टेनिस खेळले. पण, गैरसमज वाढत गेल्याने त्यांच्यातील जोडी पुन्हा जवळपास कायमचीच तुटली.

पेसच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, त्याचे आत्तापर्यंत अनेक मुलींबरोबर नाव जोडले गेले आहे. नुकतेच त्याचे नाव किम शर्मा या अभिनेत्रीसोबत नाव जोडलं जात आहे. या लेखात आपण पेसच्या चर्चित गर्लफ्रेंड्सबद्दल जाणून घेऊ.

महिमा चौधरी
तब्बल 18 दुहेरीची विजेतीपदं जिंकणारा पेस त्याच्या कारकिर्दीतील यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीबरोबर नाव जोडलं गेलं होतं. महिमा आणि पेस एका पार्टीमध्ये एकत्र भेटले होते. महिमा त्यावेळी पेससह परदेशातही जात होती. त्यांमध्ये जवळपास 3 वर्षे प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जाते. पण एकदा महिमाने पेसला तिची फसवणूक करताना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्यातील नाते संपले. महिमा चौधरीने आरोप केले होते की रिया पिल्लाईमुळे त्यांच्यातील नाते संपले.

रिया पिल्लाई
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची एक्स-पत्नी रिया पिल्लाईचे नाव देखील पेसशी जोडले गेले आहे. रिया संजय दत्तची पत्नी असतानाच पेसबरोबर डेट करत होती. पण नंतर रिया आणि संजय दत्त वेगळे झाले. त्यानंतर रिया आणि पेस हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्येही राहिले. दरम्यान, अशी चर्चा होती की 2005 ते 2008 या तीन वर्षांदरम्यान पेस आणि रिया यांनी कोलाबा येथे लग्न केले. याबद्दल रियाने दावा केला होता की तिने पेससह लग्न केले आहे. परंतु, पेसकडून याबाबत खुलासा करण्यात आला नाही. या दोघांनी 2006 साली आयाना नावाची एक मुलगी झाली. मात्र, 2014 साली रियाने पेस आणि त्याच्या वडीलांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आणि मुलीची कस्टडी मागितली. रिया आणि पेस यांनी वादानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

तनवी शाह
रिया पिल्लाईनंतर पेसचे नाव भारतीय टेनिसपटू तनवी शाहबरोबर देखील जोडले गेले. तनवी ज्यूनियर टेनिसपटू होती. तिचे 2016 सालादरम्यान पेसबरोबर नाव जोडले गेले होते. या दोघांबद्दल अशी चर्चा होती की हे दोघांनाही एकमेकांची काळजी असते, पण या दोघांनीही त्यांच्यात अफेअर होते की नाही, या चर्चांवर मौन पाळले.

किम शर्मा
‘मोहब्बतें’ या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या किम शर्मासह सध्या पेसचे नाव चर्चेत आहे. किमने यापूर्वी व्यावसायिक अली पंजानीबरोबर लग्न केले होते. पण, ते लगेचच वेगळे झाले. तिचे नाव काहीवर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगबरोबरही घेतले जात होते. आता किम शर्मा पेसबरोबर रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांना नुकतेच काहीदिवसांपूर्वी गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहाण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CTdFrbRoEqU/

किम आणि पेसने एकत्र फोटोही शेअर केले होते. त्यानंतर त्या दोघांमधील अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेटपटूनंतर टेनिसपटूंची ऑस्ट्रेलियन सरकारवर टीका; ‘हे’ आहे कारण

अफलातून! सानिया मिर्झाने २० महिन्यांनंतर पटकावले डब्ल्यूटीएचे विजेतेपद, ओस्ट्रावा ओपनमध्ये मिळवले यश

मोक्याच्या क्षणी ९.२५ कोटीच्या खेळाडूकडून घोडचूक, मग काय सीएसकेने सामनाही गमावला अन् अव्वल स्थानही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---