इंडीयन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा (Ipl mega auction 2022) थरार लवकरच सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बेंगलोरमध्ये १२ आणि १३ एप्रिल रोजी मेगा ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. ज्यामध्ये ६०० खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. यामध्ये ५३० भारतीय खेळाडूंचा आणि २७० परदेशी खेळाडूंचा सहभाग आहे. अनेकांना माहीत नसेल की,मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर बोली कशी लागते, त्यांची मूळ किंमत कोण ठरवतं, चला तर जाणून घेऊया.
आयपीएल ऑक्शन म्हणजे नक्की काय?
आयपीएल स्पर्धेचे ऑक्शन हे,कुठला खेळाडू कुठल्या संघासाठी खेळणार हे ठरवण्यासाठी केले जाते. यामध्ये सर्व संघाचे संघमालक सहभाग घेत असताना, त्यांना ज्या खेळाडूला आपल्या संघात स्थान द्यायचे असते, त्यावर ते मनसोक्त बोली लावत असतात. एखाद्या संघाने बीसीसीआयला यादी पाठवताना एखाद्या खेळाडूचा उल्लेख केला नसेल. तरीदेखील ऑक्शनमध्ये तो संघ त्या खेळाडूवर बोली लावू शकतो. ऑक्शनमध्ये सहभागी होणारे संघ पूर्ण रणनितीसह येत असतात. त्यांनी आधीच ठरवलेलं असतं की, कुठल्या खेळाडूवर किती पैसा खर्च करायचा आहे.
आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंची विभागणी कशी होते?
आयपीएल लिलावात खेळाडूंची विभागणी भारतीय खेळाडू, भारतीय अनकॅप खेळाडू आणि परदेशी खेळाडू या तीन टप्प्यात केली जाते. त्यानंतर त्यांना फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आणि यष्टिरक्षक या गटात विभागले जाते असते.
कशा पद्धतीने होते आयपीएल स्पर्धेचे ऑक्शन?
हा ऑक्शन सोहळा देखील इतर ऑक्शनसारखाच असतो. ज्यामध्ये ऑक्शन करणारा व्यक्ती सहभाग घेतलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करत असतो. त्यानंतर तो ऑक्शन करणारा व्यक्ती, प्रत्येक खेळाडू बद्दल अधिक माहिती सांगत असतो. उदा, तो खेळाडू फलंदाजी करतो की गोलंदाजी, त्याची मुळ किंमत किती आहे, त्याचे वैशिष्ठ्य काय आहे. समजा जर एखाद्या खेळाडूची मुळ किंमत २ कोटी असेल, तर त्याच्यावर २ कोटींच्या पुढे बोली लागेल. तसेच केवळ एकाच संघाने एखाद्या खेळाडूसाठी बोली लावली तर, त्याला ते मुळ किमतीत देखील खरेदी करू शकतात.
जो संघ सर्वात मोठी बोली लावतो, तो खेळाडू त्याच संघात जात असतो. तसेच अनेकदा नाव घेऊनही एखादया खेळाडूवर बोली लावली गेली नाही, तर तो अनसोल्ड होत असतो.
कशी ठरते खेळाडूंची मूळ किंमत ?
खेळाडूची मूळ किंमत हे बीसीसीआय ठरवत असते. जे खेळाडू चांगल्याच चर्चेत असतात त्यांची मूळ किंमत ही सहसा जास्त असते कारण त्यांना मोठी किंमत मिळण्याची आस असते. तसेच खेळाडू मूळ किंमत ठरवताना आपल्या प्रदर्शानाचा विचार करत असतात.
एका ऑक्शनमध्ये किती खेळाडूंवर लागते बोली?
प्रत्येक ऑक्शनमध्ये खेळाडूंची संख्या ही वेगवेगळी असते, जर मिनी ऑक्शन असेल तर, यामध्ये खेळाडूंची संख्या कमी असते. तसेच मेगा ऑक्शन असेल तर खेळाडूंची संख्या जास्त असते. आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. क्यापैकी ६०० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
ऑक्शनमध्ये खरेदी केल्यानंतर खेळाडूंना किती पैसे मिळतात?
जर एखाद्या खेळाडूला ३ वर्षासाठी ५ कोटी रुपयात खरेदी केले गेले, तर त्याला दरवर्षी ५ कोटी रुपये मिळत असतात.
महत्वाच्या बातम्या :
टीम इंडियाची ‘फिनीक्स भरारी’! वेस्ट इंडीजचा पराभव करत ४० वर्षांपूर्वीच्या कामगिरीची केली पुनरावृत्ती
हैदराबादचे अव्वल स्थान मजबूत! बंगलोरच्या सुनील छेत्रीने घातली विक्रमाला गवसणी
मेगा लिलावात होणारी ‘एक्सेलरेशन बिडींग’ म्हणजे काय रे भाऊ?