आयपीएल 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल त्याच्या एकूण कमाई (नेटवर्थ) मुळे चांगलाच चर्चेत आहे. गिलची मागील वर्षाची कामगिरी पाहता त्याला यावर्षी संघाचं कर्णधारपद मिळालं. त्यानं आयपीएल 2023 च्या हंगामात 800 हून अधिक धावा केल्या होत्या.
शुबमन गिलसाठी यंदाचा आयपीएल हंगामही चांगला राहिला. परंतु तो अद्याप आपल्या संघाला प्लेऑफ मध्ये पाेहचवण्यात यशस्वी ठरला नाही. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला शुबमन गिलची एकूण कमाई किती हे सांगणार आहोत.
शुबमन गिलची नेटवर्थ कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. त्याचा जन्म पंजाबमधील एका शेतकरी घरात झाला आहे. त्याचं शालेय शिक्षण पंजाबमध्येच झालं. गिलनं 2018 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये पर्दापण केलं होतं. तेव्हापासून तो सातत्यानं यशाच्या पायऱ्या चढत आहे.
‘स्टॉक ग्रो’ या वेबसाईटनुसार, शुबमन गिलची एकूण कमाई 32 कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच्या कमाईचे वेगवेगळे स्त्रोत आहेत. गिलचा ‘बीसीसीआय’शी ‘ब’ श्रेणीचा करार आहे. या कराराद्वारे त्याला बीसीसीआयकडून वर्षाला 3 कोटी रुपये मिळतात. याशिवाय गुजरात टायटन्ससोबत त्याचा 8 कोटी रुपयांचा करार आहे. तसेच शुबमन गिलला एका टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 3 लाख रुपये, एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये आणि एका एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये मिळतात.
शुबमन गिल विविध ब्रँडच्या जाहिराती करतो. तो टाटा कॅपिटल्स, सीएट (CEAT), जिलेट, भारत पे, माय 11 सर्कल अश्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. याद्वारे त्याची कोट्यवधी रुपयांची कमाई होते.
शुबमन गिलनं आयपीएल 2024 च्या 59 व्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 55 चेंडूत शानदार शतक झळकावून सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. या सामन्यात त्यानं सलामीवीर साई सुर्दशन सोबत 231 धावांची भागीदारी केली होती. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! आयपीएल 2024 सोडून जोस बटलर इंग्लंडला रवाना, काय आहे कारण?
ना चेन्नई ना मुंबई; ही आहे आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणारी टीम
टी20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा घेऊ शकतो क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती, जाणून घ्या कारण