---Advertisement---

भुवीचा खास फॅनला रिप्लाय; हॅलो ‘आंटी’, असा रहातो मी फीट

On: सोमवार, जुलै 13, 2020 11:00 AM
---Advertisement---

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूला फिटनेस राखण्यासाठी सराव करण्यात येत नाही. काही भारतीय खेळाडूंनी आपल्या घरातच जीम बनवली असून तेथेच ते व्यायामाचा सराव करत आहेत. दरम्यान, एका क्रिकेट फॅनने भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला फिटनेस संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्याने आपल्या स्टाईलने उत्तर दिले आहे.

नारायणी नावाच्या एका महिलेने #AskBhuvi च्या माध्यमातून एक प्रश्न विचारला की, “सध्या स्वतःला फिट राखण्यासाठी काय करतोस? तुझा आवडीचा व्यायाम कोणता? यावर भुवीने लिहले की, ” हॅलो अँटी मी माझ्या बाल्कनीमध्ये जिम तयार केलो आहे. घरपाठीमागील लॉनचा वापर रनिंग साठी करत आहे. तसेच पॉवरलिफ्टिंग माझा आवडता व्यायाम आहे.”

यावर नारायणी यांनी उत्तर दिले की, “खूपच चांगली योजना आहे बाल्कनीचा योग्य उपयोग करतात. नुपूर भ‍ाभीला प्रेम.” (भुवनेश्वरकुमारची पत्नी)

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अजून खेळाडूंना ऑउटडोर सराव करण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू आणि ऍथलिट घराच्या जवळ व्यायाम करत स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

कोरोना महामारीमुळे टी 20 विश्वचषक आणि आयपीएलच्या आयोजनात अडचणी निर्माण होत आहेत. असेच अनेक मालिका स्थगित करण्यात आले आहेत. दरम्यान इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झालं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---