---Advertisement---

अर्शदीपच्या घातक यॉर्करने दोनदा मोडला मिडल स्टंप! आयपीएलला मोठे नुकसान

Arshdeep Singh
---Advertisement---

पंजाब किंग्ज संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात अर्शदीपने मुंबईच्या दोन खेळाडूंना त्रिफळाचीत केले आणि दोन्ही वेळी मधल्या स्टंम्पचे दोन तुकडे केले. अर्शदीपच्या या भेदक गोलंदाजीसाठी त्याचे कौतुक होत आहे. पण या हे दोन स्टंम्प तुटल्यामुळे आयपीएलला नक्कीच किंमत मोजावी लागली.

मुंबई इंडियन्सला विजयासाठी 215 धावांचे लक्ष्य मिळाले होते. चालू आयपीएल हंगामात आपली गुणवत्ता सिद्ध केलेला तिलक वर्मा (Tilak Varma) आणि इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेला नेहाल वढेरा यांना अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने शेवटच्या षटकात त्रिफळाचीत केले, तेदेखील लागोपाठ चेंडूंवर. हे दोन्ही चेंडू यॉर्कर होते आणि मधल्या स्टम्पच्या मध्यभागी जाऊन लागले. एलईडी लाईट असलेल्या या स्टंपच्या एका सेटची किंमत 30 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 40 लाख रुपये आहे.

https://twitter.com/JioCinema/status/1649836081423224832?s=20

अर्शदीपला या शेवटच्या षटकात हॅट्रिकची संधी होती. पण त्याने जोफ्रा आर्चरला वाईड यॉर्कर टाकला, ज्यावर विकेट मिळू शकली नाही. शेवटच्या षटकात मुंबईचे फलंदाज अपघ्या दोन धावा घेऊ शकले. सूर्यकुमार यादव याने 57, तर कॅमरून ग्रीन याने 67 धावांची सर्वात मोठी खेळी मुंबईसाठी केली. असे वाटत होते की, मुंबई इंडियन्स संघ वानखडे स्टेडियमवर पहिल्यांदाच 200 धावांपेक्षा मोठे लक्ष्य गाठेल. पण यावेळीही तसे होऊ शकले नाही. मात्र 18 व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या अर्शदीपने खेळपट्टीवर सेट झालेल्या सूर्यकुमार यादवला वाद केले आणि सामन्यात पुरनागमन केले. 18व्या षटकात मुंबईला अवघ्या 9 धावा मिळाले.

अर्शदीपने या सामन्यात आपल्या चार षटकात 29 धावा दिल्या आणि सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. याचसोबत त्याने पर्पल कॅप देखील मिळवली. त्याने हंगामात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. पंजाब किंग्जसाठी 50 विकेट्स घेणारा अर्शदीप आयपीएल इतिहासातील चौथा गोलंदाज बनला आहे. (Know the cost of Arshdeep Singh’s broken middle stump)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

अर्शदीपने स्टंप्ससह तोडले मुंबईकरांचे हृदय! अखेरच्या षटकात पंजाबचा 13 धावांनी विजय
‘कमबॅक किंग’ मोहित! तीन सामन्यांत दोनदा सामनावीर होत स्वतःला केले सिद्ध

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---