---Advertisement---

आज विराट नसता, तर ‘तो’ नक्कीच असता, वाचा सीएसकेच्या यशाच्या अनसंग हीरोबद्दल

On: बुधवार, जून 8, 2022 2:45 PM
S-Badrinath
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्स… आयपीएल इतिहासातील सगळ्यात कंसिस्टंट टीम. एक सीझन सोडला तर त्यांनी सगळ्याच सिझनचे प्ले ऑफ खेळले. पहिल्या चार पाच वर्षात तर त्यांचा कोणी नादच केला नाही. धोनीच्या या टीममध्ये तसे तर सारेच सुपरस्टार होते, पण एक खेळाडू असा होता ज्याच्यावर टीम मॅनेजमेंट आणि टीममेट्स डोळे झाकून विश्वास ठेवायची. तो संघाचा मिस्टर डिपेंडेबल होता. हा खेळाडू म्हणजे सुब्रमण्यम बद्रीनाथ.

बद्रीनाथ प्रॉपर चेन्नईचाच. क्रिकेट व्यतिरिक्त त्याची एक खास ओळख म्हणजे. तो चेन्नईच्या सगळ्यात प्रतिष्ठित पद्मशेषाद्री बालभवन शाळेचा विद्यार्थी. असं म्हणतात की या शाळेतून फक्त स्टार तयार होतात. गुगलचे सीईओ सुंदर पीचाई, भारताचा अनुभवी क्रिकेटर रविचंद्रन अश्विन, फिल्मस्टार सूर्या आणि रामचरण तेजा हे सारे याच शाळेचे विद्यार्थी.

चेन्नईत एक गोष्ट नक्की असते ती म्हणजे मुलगा उच्चशिक्षण घेतो आणि क्रिकेट खेळतो. बद्रीनाथ त्यापैकीच एक. सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगने प्रभावित झालेल्या बद्रीने लहानपणीच क्रिकेटर व्हायचे फिक्स करून ठेवले. वडिलांनाही क्रिकेटची आवड ‌होती. ते स्वतः त्याच्यावर मेहनत घेत. त्यांनी एकेक शॉट त्याच्याकडून चांगला घोटून घेतला. बद्रीनाथ प्रोफेशनल क्रिकेटर झाला.

हेही पाहा- बद्रीनाथला संधी दिली नाही म्हणून निवड समिती प्रमुखाला राजीनामा द्यावा लागला

बद्रीचा फर्स्ट क्लास डेब्यू झाला २००० ला. तो कंसिस्टंट होता म्हणून २००५ला तमिळनाडूचा कॅप्टन बनला. कॅप्टन्सीचा दबाव त्याने घेतला नाही आणि आपली शानदार कामगिरी चालू ठेवली. या कामगिरीनंतर त्याला टीम इंडियामध्ये जागा मिळाली खरी, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण होते. कारण, त्यावेळी संघात द्रविड, गांगुली, युवराज, लक्ष्मण मिडल ऑर्डर सांभाळत होते. त्यानंतर त्याला संघातून बाहेर केले गेले.

टीम इंडियात निवड होत नसल्याने तो उद्विग्न झाला. त्याने पब्लिकली म्हटले, “मला कमीत कमी अपयशी व्हायची तरी संधी द्या.” त्याचवेळी २००८ला श्रीलंका टूरवर अंडर‌ १९ स्टीलचा कॅप्टन विराट कोहलीला संघात जागा मिळाली. बद्रीनाथवर अन्याय झाल्याचे बोलले गेले. नशिबाने त्या टूरवर सचिन एन्जर्ड झाला आणि बद्रीनाथला बोलावले गेले. एक मॅचमध्ये मॅच विनिंग इनिंग आणि नंतर पुन्हा दोन मॅचमध्ये फ्लॉप अशी खराब कामगिरी त्यांनी नोंदवली. पुढे दोन वर्षांनी त्याने कमबॅक केला. तो टेस्टही खेळला, पण तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून १० मॅचच्या पुढे त्याचे इंटरनॅशनल करिअर जाऊ शकले नाही.

इंटरनॅशनल करिअर खास राहिले नसले तरी आयपीएलमध्ये त्याने भरपूर नाव कमावले. सीएसकेसाठी त्याने सहा सीझन खेळले. चेन्नईला दोनदा आयपीएल चॅम्पियन आणि दोनदा चॅम्पियन्स लीग विनर बनवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. सुरेश रैनासोबत तो मिडल ऑर्डर अशी काही सांभाळायचा की, भल्याभल्यांना त्याला आउट करताना नाकी नऊ यायचे.

काही वर्षांपूर्वी बद्रीनाथ आणि विराट कोहलीबाबत एक मोठा खुलासा झाला होता. टीम इंडियाचा तत्कालीन कॅप्टन एमएस धोनी आणि हेड कोच गॅरी कर्स्टन यांना सुरुवातीस विराटच्या टॅलेंटवर शंका होती. त्यामुळे त्यांना विराटच्या जागी बद्रीनाथला संधी द्यायची होती. विराट अंडर १९ वर्ल्डकपनंतर चर्चेत होता. त्यावेळी सिलेक्शन कमिटीचे चेअरमन असलेल्या दिलीप वेंगसरकर यांनी विराटला श्रीलंका टूरवर निवडले. असे देखील म्हणतात की, त्यावेळी एन श्रीनिवासन यांनी आपले बीसीसीआयमधील वजन वापरत वेंगसरकर यांना बद्रीनाथची निवड न केल्यामुळे राजीनामा द्यायला भाग पाडले होते. वेंगसरकर यांनीदेखील याबाबत बोलताना एका मुलाखतीत आपल्याला त्या निर्णयाची किंमत चुकवावी लागली, असे म्हटलेले.

कमी संधी मिळाली अथवा राजकारण झाले असे काहीही म्हटले तरी. बद्रीनाथ टॅलेंटेड होता यात कोणालाही शंका नव्हती. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दहा हजार रन्स त्याचा पुरावा आहे. ज्याप्रकारे अमोल मुजुमदार, मिथून मन्हास, धीरज जाधव हे अफाट प्रतिभा असूनही कदाचित चुकीच्या काळात जन्मल्यामुळे इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकले नाही. तोच प्रकार बद्रीनाथसोबत झाला असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हवा तसा मान त्याला मिळाला नसला तरी. आयपीएलमध्ये सीएसकेच्या यशाचा अनसंग हीरो मात्र तो नक्की बनला.

बद्रीनाथला संधी दिली नाही म्हणून निवड समिती प्रमुखाला राजीनामा द्यावा लागला । Subramaniam Badrinath

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

धोनीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या हेडनला ‘ती’ बॅट वापरण्यास केलेला विरोध, काय होती त्या बॅटची खासियत?

चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली

मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---