1 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची बुधवारी (18 जुलै) निवड करण्यात आली.
या कसोटी संघात युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांची वर्षाव होत आहे.
पंतनेही सोशल मिडियावर पोस्ट टाकत त्याच्या निवडीबद्दल कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला आहे.
त्याच्या या निवडीबद्दल अभिनंदनाचे अनेक संदेश खेळाडूंनी सोशल मिडियावर केले आहेत. यातील भारताचा गोलंदाज राहुल शर्माने केलेल्या शुभेच्छाच्या ट्विटवर इंग्लंडची फलंदाज डॅनिएल वॅटनेही कमेंट केली आहे.
Congratulations my bro really happy for you @RishabPant777 test selection 👏👏👏🇮🇳😊👍
— Rahul Sharma (@ImRahulSharma3) July 18, 2018
या कमेंटमध्ये तिने पंतचे अभिनंदन केले आहे,तसेच त्याला यासाठी तो योग्यतेचा होता असेही म्हटले आहे. तिच्या या शुभेच्छासाठी पंतनेही तिला थँक्यू असे ट्विट केले आहे.
Congrats Pantyyyy! 🙌🏽 well deserved
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) July 18, 2018
Thanku 🤗🤗
— Rishabh Pant (@RishabhPant17) July 18, 2018
त्यामुळे त्यांचा हा ट्विटरवरील संवाद सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे.
https://twitter.com/desi27834/status/1019716087347367936
Ye pategi 😂
— Ravi Sen (@senr0040) July 19, 2018
U mean penttty ? Sounds good…
— Abdul Basit ℹ (@EngrABasit) July 18, 2018
रिषभने भारतीय अ संघाकडून इंग्लंड दौऱ्यात खेळताना मागील दोन कसोटी सामन्यात 3 अर्धशतके केली आहेत.
तसेच वॅट ही भारताचा कर्णधार विराट कोहलीची फॅन असुन तिने एकदा त्याला लग्नाची मागणी देखील घातली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–एकही धाव आणि एकही विकेट न घेता कसोटी सामना जिंकणारा तो ठरला १२ वा कर्णधार
–श्रीलंकेच्या या खेळाडूचे अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबन!
–पाकिस्तानी गोलंदाजाची चालाखी, पहा कसे केले सेलिब्रेशन