fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एकही धाव आणि एकही विकेट न घेता कसोटी सामना जिंकणारा तो ठरला १२ वा कर्णधार

सोमवारी (23 जुलै) श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 199 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा व्हाइटवॉश दिला.

मात्र विजयाबरोबरच या सामन्यात श्रीलंकेचा प्रभारी कर्णधार असलेल्या सुरंगा लकमलच्या नावावर एक नकोसा असा विक्रम नोंदवला गेला आहे.

या सामन्यात लकमलला एकही धाव आणि एकही विकेट घेता आली नाही. तसेच त्याला या सामन्यात एकही झेल किंवा स्टपिंगही करता आले नाही. त्यामुळे तो असे करणारा जगातील एकूण 12 वाच कर्णधार ठरला आहे. तर श्रीलंकेचा मार्वन अटापट्टूनंतरचा दुसराच कर्णधार ठरला आहे.

या सामन्यात तो श्रीलंकेच्या पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला होता, तर दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. तसेच त्याने या सामन्यात फक्त दोन षटके  गोलंदाजी केली.

या विक्रमाबरोबरच आणखी एक विक्रम लकमलच्या नावावर झाला आहे. तो असा की लकमल हा कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात विजयी संघाकडून सर्वात कमी षटके टाकणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

एकही धाव, एकही विकेट न घेता आणि एकही झेल किंवा स्टपिंगही न करता कसोटी सामन्यात विजय मिळवणारे कर्णधार:

बिल वुडफुल – आॅस्ट्रेलिया

जॅकी ग्रँट – विंडिज

डॉन ब्रॅडमन – आॅस्ट्रेलिया

इयान क्रेग – आॅस्ट्रेलिया

क्लाईव्ह लॉइड – विंडिज

सर व्हिव रिचर्डस् – विंडिज

हँसी क्रोनिए – दक्षिण आफ्रिका

नासिर हुसेन – इंग्लंड

स्टीव्ह वॉ – आॅस्ट्रेलिया

मार्वन अटापट्टू – श्रीलंका

इंझमाम-उल-हक – पाकिस्तान

सुरंगा लकमल – श्रीलंका

महत्त्वाच्या बातम्या:

श्रीलंकेच्या या खेळाडूचे अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबन!

पाकिस्तानी गोलंदाजाची चालाखी, पहा कसे केले सेलिब्रेशन

टीम इंडियाच्या खेळाडूंना पुढील एक महिन्यासाठी रहावे लागणार पत्नीपासून दूर?

You might also like