बुधवारी (22 आॅगस्टला) इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना नॉटींगघममधील ट्रेंटब्रिज मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला.
या सामन्यानंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी घोषित केली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने वयक्तिक सर्वोत्तम 937 गुण मिळवताना अव्वल स्थानही पटकावले आहे.
त्याने आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकत हे प्रथम स्थान मिळवले आहे.
त्याने मिळवलेल्या 937 गुणांमुळे तो आता सार्वकालीन कसोटी क्रमवारीत 11 व्या स्थानी आला आहे. यात त्याने एबी डेविलियर्स, जॅक कॅलिस आणि मॅथ्यू हेडन यांना मागे टाकत हे 11 वे स्थान मिळवले आहे.
या यादीत पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्यासाठी विराट फक्त एका गुणाने मागे आहे. या कसोटी मालिकेत अजून दोन सामने बाकी असल्याने विराटला या यादीतील त्याचे स्थान वधारण्याची संधी आहे.
या यादीत अव्वल स्थानी सर डॉन ब्रॅडमन असून त्यांनी 1948 साली सर्वाधिक अर्थात 961 गुण कमावले होते.
विराटने एजबस्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीनंतरही अव्वल स्थान मिळवले होते. परंतू लॉर्ड्स कसोटीनंतर त्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली होती.
विराटने तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
JUST IN
Virat Kohli regains the No.1⃣ spot on the @MRFWorldwide ICC Test Ranking for batsmen!
👉 https://t.co/NAealoygk9 pic.twitter.com/reySDwtB56
— ICC (@ICC) August 23, 2018
विराट बरोबरच या कसोटी क्रमवारीत चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी कायम आहे, तर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांची प्रगती झाली आहे. रहाणे आणि शिखर या दोघांनीही प्रत्येकी चार स्थानांची प्रगती करत अनुक्रमे 19 आणि 22 वे स्थान मिळवले आहे.
तसेच तिसऱ्या कसोटीत अष्टपैलू खेळ केलेल्या हार्दिक पंड्यानेही फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत प्रगती केली आहे. तो फलंदाजाच्या क्रमवारीत तो 51 व्या स्थानी आला आहे.
तर गोलंदाजी क्रमवारीतही त्याने 23 स्थानांची प्रगती करत 51 वेच स्थान मिळवले आहे आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो मोठी झेप घेत 44 व्या स्थानावरुन 17 व्या स्थानी आला आहे.
याबरोबरच गोलंदाजी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचीही क्रमवारी वधारली आहे. त्याने 8 स्थानांची झेप घेत 37 वे स्थान मिळवले आहे. ही त्याची वयक्तिक सर्वोत्तम क्रमवारी आहे.
इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये जॉस बटलरने 22 स्थानांची प्रगती करत फलंदाजी क्रमवारीत 47 वे स्थान मिळवले आहे. तसेच आदिल रशीदनेही फलंदाजांच्या क्रमवारीत 116 वे स्थान मिळवले आहे.
रशीदने गोलंदाजी क्रमवारीतही 4 स्थानांची प्रगती करत 47 वे स्थान मिळवले आहे. तर ख्रिस वोक्सने 31 वे स्थान मिळवले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश
–विराट कोहलीचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या विक्रमालाही धक्का
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचे संपुर्ण वेळापत्रक जाहीर, फायनल होणार मुंबईत