---Advertisement---

स्मिथला मागे टाकत किंग कोहली पुन्हा अव्वल क्रमांकावर विराजमान!

On: बुधवार, डिसेंबर 4, 2019 2:22 PM
---Advertisement---

या आठवड्यात नुकतेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्या. या मालिकेनंतर आज आयसीसीने कसोटी क्रमवारी(ICC Test Ranking) जाहीर केली आहे.

या क्रमवारी फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथची(Steve Smith) अव्वल क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) पुन्हा एकदा आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे.

विशेष म्हणजे विराट आयसीसी वनडे क्रमवारीतही फलंदाजामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. आता कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत विराट आणि स्मिथमध्ये 5 गुणांचे अंतर आहे. विराट 928 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर स्मिथ 923 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

याबरोबरच पाकिस्तान विरुद्ध ऍडलेड कसोटीत नाबाद 335 धावांची खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरनेही क्रमवारीत 12 क्रमांकाची मोठी झेप घेत 5 वे स्थान मिळवले आहे.

त्याचबरोबर मार्नस लॅब्यूशानेनेही ऍडलेड कसोटीत केलेल्या शानदार 162 धावांच्या खेळीच्या जोरावर कारकिर्दीत पहिल्यांदाच पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता 8 व्या क्रमांकावर आला आहे.

पहिल्या 10 फलंदाजांमध्ये भारताचा विराट कोहली व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आणि अजिंक्य रहाणे 6 व्या क्रमांकावर आहेत.

तसेच पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने दोन स्थान पुढे येत 13 वा क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने हॅमिल्टन कसोटीत केलेल्या 226 धावांच्या खेळीच्या जोरावर 7 वा क्रमांक मिळवला आहे. तसेच रॉरी बर्न्स 36 व्या क्रमांकावर आला आहे. तर पाकिस्तानचा शान मसूद 47 व्या क्रमांकावर आला आहे.

याबरोबरच इंग्लंड विरुद्ध नाबाद 104 धावांची खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर नाबाद 105 धावा करणारा रॉस टेलर 2 क्रमांकाने पुढे येत रोहित शर्मासह 16 व्या क्रमांकावर आला आहे.

गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर मिशेल स्टार्क 4 क्रमांकाने पुढे येत 14 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहिन आफ्रिदी 13 स्थानांनी पुढे येत 49 व्या क्रमांकावर आला आहे. टीम साउथीही एका स्थान वर जात 13 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

वेस्ट इंडीजकडून अफगाणिस्तान विरुद्ध शानदार कामगिरी करणारा राहकिम कॉर्नवॉलनेही पहिल्या 50 गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. तो आता 63 स्थानांनी पुढे येत 47 व्या क्रमांकावर आला आहे. तर वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डन गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर कायम आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---