---Advertisement---

आयसीसी पुरस्कारात बाजी मारणाऱ्या किंग कोहलीने केले हे खास ५ विक्रम

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) आज 2018 या वर्षातील पुरस्कार जाहिर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये विराट कोहलीचाच बोलबाला राहिला असून त्याने आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत.

विराटला आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार तसेच 2018 या वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू आणि कसोटीपटू असे दोन पुरस्कारही विराटला जाहिर झाले आहेत. त्यामुळे त्याने हे पुरस्कार मिळवण्याबरोबरच अनेक विक्रमही रचले आहे.

आयसीसीने 2018 चे वनडे आणि कसोटीचा 11 जणांचा सर्वोत्तम संघही जाहीर केला असून या दोन्ही संघाचा कर्णधारही विराटला करण्यात आले आहे. विराटसाठी 2018 हे वर्ष विशेष होते.

या आयसीसीच्या पुरस्कारांसाठी 01 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेतली होती. विराटने या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 37 सामन्यातील 47 डावात 68.37 च्या सरासरीने 2735 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 11 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

विराटला 2017 चाही आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा आणि सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.

याबरोबरच विराटने केले हे खास विक्रम – 

– आयसीसीच्या वर्षीतील सर्वोत्तम क्रिकेटपटू, वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू हे तीनही महत्त्वाचे पुरस्कार एकाच वर्षात मिळवणारा आत विराट कोहली ठरला पहिला क्रिकेटपटू.

– आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार सर्वाधिक वेळा मिळवण्याच्या एबी डिविलियर्सच्या विक्रमाशी विराट कोहलीने केली बरोबरी. विराट आणि डिविलियर्स यांनी प्रत्येकी तीन वेळा मिळवला आहे हा पुरस्कार. डिविलियर्सने 2010, 2014 आणि 2015 तर विराटने 2012, 2017 आणि 2018 या वर्षात पटकावला हा पुरस्कार.

– आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार दोन वेळा मिळवणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहलीचाही समावेश. विराटने 2017 आणि 2018 असे सलग दोन वर्षी मिळवला हा पुरस्कार. तर याआधी ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सनने 2009 आणि 2014 आणि रिकी पाँटिंगने 2006 आणि 2007 या वर्षात हा पुरस्कार मिळवला आहे.

-तसेच सलग दोन वर्षे आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणारा विराट पाँटिंग नंतरचा दुसराच क्रिकेटपटू.

-आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणारा विराट चौथा भारतीय याआधी 2004 मध्ये राहुल द्रविड, 2010 मध्ये सचिन तेंडुलकर, 2016 मध्ये आर अश्विन यांना मिळला होता हा पुरस्कार.

– विराटने कारकिर्दीत पहिल्यांदाच पटकावला आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार.

महत्त्वाच्या बातम्या-

किंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी

शतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment