सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून(3 जानेवारी) चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघ जेव्हाही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकला आहे तेव्हा कधीही सामना पराभूत झालेला नाही.
विराटचा कर्णधार म्हणून हा 46 वा कसोटी सामना आहे. त्याने याआधी45 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करताना 21 सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. या 21 सामन्यांपैकी 18 सामन्यात भारताने विजय मिळवला असून 3 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
तसेच त्याने नाणेफेक हरलेल्या 24 सामन्यांपैकी भारताला 8 सामन्यात विजय 10 सामन्यात पराभव मिळला आहे. तर 6 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
आत्तापर्यंत कर्णधार असताना फक्त महान माजी फलंदाज डॉन ब्रॅडमन नाणेफेक जिंकल्यानंतर कधीही सामना हरलेले नाही. त्यांनी 10 सामन्यात नाणेफेक जिंकली असून 9 सामन्यात विजय मिळवला आहे आणि 1 सामना अनिर्णीत राहिला आहे.
त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर सामना पराभूत होण्याची सर्वात कमी टक्केवारी ही विराट आणि ब्रॅडमन यांची आहे. त्यांची ही टक्केवारी शून्य आहे. त्यांच्य़ा पाठोपाठ इंग्लंडचे माजी कर्णधार कॉलीन काउड्रे असून त्यांनी नाणेफेक जिंकलेल्या 17 सामन्यात एक सामना पराभूत झालेला आहे. त्यांमुळे त्यांची ही टक्केवारी 5.88 अशी आहे.
त्यानंतर या यादीत अनुक्रमे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीसचा आणि न्यूझीलंड कर्णधार केन विलियमसनचा क्रमांक लागतो. डुप्लेसीसने 14 कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. त्यातील एक सामना तो पराभूत झाला आहे. त्याची टक्केवारी ही 7.14 अशी आहे.
तर विलियमसनने 11 सामन्यात नाणेफेक जिंकली असून त्यानेही एक सामना पराभूत झाला आहे. त्याची टक्केवारी ही 9.09 अशी आहे.
तसेच 26 डिसेंबर 2014 पासून भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर कधीही पराभव स्विकारलेला नाही. त्यामुळे 26 डिसेंबर 2014 पासून नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वात कमी पराभव पत्करण्याच्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे.
त्याच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिका असून त्यांनी 17 सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर 3 पराभव स्विकारले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकलेल्या 17 सामन्यांपैकी 3 सामन्यात पराभव पत्करला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–बॅटवर स्टिकर, बाॅडीवर टॅटू नसलेला मयांक अगरवाल राहुल- विजयला सरस
–षटकारांची बरसात करत त्या खेळाडूने मोडला हिटमॅनचा हिट विक्रम
–सिडनी कसोटीत शतकवीर पुजारा चमकला, केले हे ५ खास विक्रम