मँचेस्टर। 2019 विश्वचषकात गुरुवारी(27 जून) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडीज संघातील 34 व्या सामन्यात भारताने 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची तर एमएस धोनीने नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यात धोनीने धीम्या गतीने सुरुवात केली होती. पण नंतर त्याने आक्रमक फटके मारत अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला प्रथम फलंदाजी करताना 268 धावांचा टप्पाही गाठून दिला. धोनीवर मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तान विरुद्ध धीम्या गतीने खेळी केल्याबद्दल टीका होत आहे.
पण विंडीज विरुद्धच्या सामन्यानंतर विराटने धोनीला नेहमीच पाठिंबा देत राहु, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.
विराट म्हणाला, ‘धोनीला मधे काय करायचे आहे हे त्याला पक्के माहित असते. जेव्हा त्याचा एखादा दिवस वाईट असतो, तेव्हा सर्वजण बोलायला लागतात पण आमचा त्याला नेहमीच पाठिंबा आहे.’
‘त्याने आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत आणि जेव्हा तूम्हाला ज्यादाचे 15-20 धावा हव्या असतात तेव्हा त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे. त्याला माहित आहे या धावा कशा करायच्या.’
‘त्याचा अनुभव आम्हाला 10 पैकी 8 वेळा फायदेशीर ठरतो. तो खेळाला उत्तमप्रकारे जाणतो. तो आम्हाला नेहमीच तो अभिप्राय पाठवतो, आपल्याला माहित आहे की 260 ही चांगली धावसंख्या आहे. तो या खेळातील दिग्गज आहे. आपल्या सर्वांना हे माहित आहे. आशा आहे त्याची लय कायम राहिल.’
तसेच विराट सामन्याबद्दल म्हणाला, ‘शेवटचे दोन सामने, आम्ही विचार केला तसे झाले नाहीत. हे मोठ्या धावसंख्येचे सामने झाले नाही. पण आम्हाला विजय मिळाला. आक्रमकता ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. मानसिकता खरंच महत्त्वाची आहे. काहीही अशक्य नाही. आम्हाला वाटते आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू.’
"He knows exactly what he wants to do out there in the middle … That's his strength to play calculated cricket. He's a legend of the game, we all know that."
These two ???? pic.twitter.com/cFpIHuk5YC
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 27, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून रोहित शर्माच्या विकेटची होत आहे सर्वाधिक चर्चा
–अर्धशतकी खेळी करत एमएस धोनीने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी






