---Advertisement---

…म्हणून रोहित शर्माच्या विकेटची होत आहे सर्वाधिक चर्चा

On: गुरूवार, जून 27, 2019 8:45 PM
---Advertisement---

मँचेस्टर। 2019 विश्वचषकात आज(27 जून) भारत विरुद्ध विंडीज संघात 34 वा सामना सुरु आहे. ऑल्ड ट्रॅफर्ड मैदानात सुरु असलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 268 धावांची खेळी केली. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची तर एमएस धोनीने नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी केली.

मात्र आज भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला त्याची विकेट 6 व्याच षटकात 23 चेंडूत 18 धावांवर असताना गमवावी लागली. पण त्याच्या विकेटने मोठा वाद निर्माण केला आहे.

झाले असे की केमार रोच गोलंदाजी करत असलेल्या सहाव्या षटकातील शेवटचा चेंडूवर विंडीजने रोहित यष्टीमागे झेलबाद झाल्याचे अपिल केले. यावेळी चेंडू बॅटच्या आतली कड घेऊन यष्टीरक्षक शाय होपच्या हातात गेला असल्याचे विंडीजच्या खेळांडूंचे मत होते. पण मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी रोहितला नाबाद देत हे अपिल फेटाळले.

परंतू विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली. या रिव्ह्यूने सर्वांना आणखी गोंधळात टाकले. कारण चेंडू बॅट आणि पॅडच्या मधे दिसत होता. तसेच अल्ट्राएजमध्ये काही स्पाईक दिसत होते. पण बॉल नक्की पॅडला लागला आहे की रोहितच्या बॅटला लागला हे लक्षात येत नव्हते.

पण आणखी जवळून बघण्याआधीच थर्ड अंपायर मायकल गफ यांनी रोहितला बाद दिले. यावर रोहितनेही नाराजी व्यक्त केली. पण गफ यांनी बाद दिल्याने रोहितला ड्रेसिंगरुममध्ये परतावे लागले. रोहित अशा प्रकारे बाद झाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सोशल मीडियावरही रोहितच्या विकेटवर बरिच चर्चा रंगली आहे.

https://twitter.com/umairkundi/status/1144185119332343808

https://twitter.com/Shashank654/status/1144206168585150465

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

अर्धशतकी खेळी करत एमएस धोनीने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी

धवन, विराटला मागे टाकत बाबर आझमने रचला नवीन विश्वविक्रम

असा भीम पराक्रम करणारा विराट कोहली पहिलाच भारतीय कर्णधार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment