तब्बल 302 धावांनी श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत भारतीय संघाने गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, आशिया चषकातील अंतिम सामन्याप्रमाणे इथेही श्रीलंका संघाचा डाव भारतीय वेगवान गोलंदाजांपुढे ढेपाळला. त्यांना 55 धावांवर सर्व विकेट्स गमवाव्या लागल्या. या सामन्यात शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांनी बॅटमधून कमाल दाखवली, तर गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी आग ओकली. अशात या सामन्यातील विराट कोहली याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याचा स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. विराट मैदानावर जेवढा आक्रमक असतो, तितकाच त्याचा मजेशीर अंदाजही चाहत्यांच्या पसंतीस पडतो. अशात भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) सामन्यादरम्यान विराटचा एक व्हिडिओ (Virat Kohli Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चाहत्यांनी विराटकडे गोलंदाजीची मागणी केली. त्यानंतर त्यानेही खास अंदाजात चाहत्यांची मने जिंकली.
नेमकं काय घडलं?
श्रीलंका संघ 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी कहर गोलंदाजी केली. श्रीलंकेचे 6 गोलंदाज अवघ्या 14 धावांवर तंबूत परतले. यानंतर स्टेडिअममध्ये उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी ‘कोहली को बॉल दो’ (Kohli Ko Ball Do) म्हणजेच विराटला चेंडू द्या, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी चाहत्यांच्या मागणीनंतर विराटही मस्तीच्या मूडमध्ये दिसला. त्यानेही वॉर्मअप करत चाहत्यांचे मनोरंजन केले. आता विराटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
https://www.instagram.com/reel/CzJiacjykmN/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://twitter.com/SaraTendulkarI/status/1720094991132041222?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1720094991132041222%7Ctwgr%5Ee110e5765e7444f7315274649a7a551fe5c5fceb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fcricket-hindi%2Fkohli-ko-ball-do-crowd-shouting-and-virat-starts-warming-up-in-ind-vs-sl-world-cup-2023-match-6469237%2F
Virat Kohli mimics his bowling action & the crowd started chanting
KOHLI KO BALL DO 😅#INDvsSL #RohitSharma𓃵 #ViratKohli #CWC23INDIA #abhiya #elvisha #abhisha #INDvsENG #CricketWorldCup #CricketWorldCup2023 pic.twitter.com/yYurYTL7Jn
— Virat Kohli(parody) (@harshraj5056) November 2, 2023
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवत निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमात 357 धावा केल्या. यावेळी शुबमनने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. तसेच, विराट कोहलीने 88, तर श्रेयस अय्यरने 56 चेंडूत 82 धावांची वादळी खेळी केली. यावेळी रवींद्र जडेजानेही 35 धावांचे योगदान दिले. यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना दिलशान मदुशंका याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 19.4 षटकात 55 धावांवर संपुष्टात आला. यावेळी मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराजने 3, तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (kohli ko ball do crowd shouting and virat starts warming up in ind vs sl match cwc 2023 )
हेही वाचा-
ना विराट, ना शमी, रोहितने ‘या’ खेळाडूवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला, ‘त्याने दाखवून दिलं की…’
कॅप्टन असावा तर असा! खास शुज चाहत्याला केला भेट, विजयानंतर जिंकली लाखोंची मने