आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानासाठी दिली जाणारी मानाची गदा प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर भारताला १ मिलियन डॉलर्स रकमेचे बक्षीसही देण्यात आले.
आयसीसी चॅम्पीसनशिपची गदा विराटला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू ग्रमी पाॅलाॅक यांच्या हस्ते देण्यात आली. हा सोहळा भारतीय संघाचा शेवटचा सामना केप टाउन येथे झाल्यावर पार पडला.
भारतीय संघाला सलग दुसऱ्या वर्षी ही मानाची गदा मिळाली आहे. मागील वर्षीच्या मोसमातही भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. तसेच ही गदा पटकावणारा विराट कोहली जगातील एकूण १० वा तर दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी २०१० आणि २०११ मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ही गदा मिळवली होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका संपली तेव्हा भारताचे १२१ गुण झाले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकाचे ११५ गुण आहेत. त्यामुळे जरी दक्षिण आफ्रिका आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असली तरी त्यांना अव्वल स्थान मिळवण्याची संधी नाही. यामुळेच भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान या मोसमात कायम राहणार आहे.
या कर्णधारांना मिळाली होती आयसीसी चॅम्पीसनशिपची गदा
स्टीव वाॅ, रिकी पाॅन्टींग, मायकेल क्लार्क, स्टीव स्मिथ (सगळे आॅस्टे्लीया), अॅंड्रू स्टाॅस (इंग्लॅड), ग्रमी स्मिथ, हशीम अमला ( दोघे दक्षिण आफ्रिका), मिसबाह ऊल हक (पाकीस्तान), एम एस धोनी, विराट कोहली (दोघे भारत )
Video:
Watch: @imVkohli was awarded with the ICC Test Championship Mace last night in Cape Town, with India confirmed to be retaining the top spot in the @MRFWorldwide ICC Test Team Rankings at the April cut-off date! 👏 pic.twitter.com/37FJOgVxsb
— ICC (@ICC) February 25, 2018