---Advertisement---

मी असा नाही..! नेतृत्त्व सोडण्यापूर्वी कोहलीला बीसीसीआयमधून आला होता फोन; पण धुडकावली मोठी ऑफर

On: सोमवार, जानेवारी 17, 2022 10:26 AM
VIRAT-KOHLI-GANGULY-SHAH
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही मालिका कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या (Virat Kohli)  कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरली आहे. तब्बल ७ वर्ष कसोटी संघाचे नेतृत्व केल्यानंतर त्याने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठा उलगडा केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी (१४ जानेवारी) विराट कोहलीला फोन केला होता आणि कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळण्यास सांगितले होते. तरीही विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, विराटने कर्णधार म्हणून हा बेंगलोरमध्ये होणारा १०० वा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. विराटचे म्हणणे होते की, एका सामन्याने काहीच होत नाही.

व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव

विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. परंतु त्याला आपल्या कारकीर्दीचा शेवट पराभवाने करावा लागला. भारतीय संघ येणाऱ्या महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध कसोटी मालिकेत दोन हात करणार आहे.

यापूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने देखील ऑस्ट्रेलिया कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय दिला होता. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर याच एमएस धोनीचा उल्लेख करत त्याचे आभार मानले आहेत.

काही दिवांपूर्वी विराटने आयसीसी टी२० विश्वचषक झाल्यानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. विराटने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांना असे ही वाटत आहे की, बीसीसीआयमध्ये काहीतरी सुरू आहे ज्यामुळे विराट कोहलीने ही टोकाची भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या :

कोहलीच्या निर्णयावर कुटुंबातून आली प्रतिक्रिया; भाऊ, बहिण म्हणाले, ‘आम्ही सदैव तुझ्या पाठिशी’

“त्याचे चेंडू म्हणजे बंदुकीच्या गोळ्या”; ‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धनचा फॅन बनला किवी दिग्गज

हे नक्की पाहा:

विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव। Kohli thanks Dhoni-Shastri

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---