भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही मालिका १७ डिसेंबर पासून सुरू होणार होती. परंतु, दक्षिण आफ्रिकेत ऑम्रीकॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या मालिकेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मालिका आता २६ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या मालिकेदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आपली मुलगी वामिकाला (Vamika) एक खास भेट देऊ शकतो.
विराट कोहलीची मुलगी वामिका हिच्यासाठी ११ जानेवारी २०२२ हा दिवस खास असणार आहे. या दिवशी वामिकाचा पहिला वाढदिवस असणार आहे. याच दिवशी विराट कोहली आपल्या कसोटी मालिकेतील १०० वा कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने २०११ मध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत एकूण ९७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे जर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सर्व कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली, तर शेवटचा सामना हा १०० वा सामना ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ११ जानेवारी २०२२ रोजी सुरु होणार आहे.
विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात आठवणीतला क्षण असणार आहे. यासह त्याचा हंड्रेड क्लबमध्ये समावेश होणार आहे. या दिवशी कोट्यवधी चाहते त्याचा उत्साह वाढवतील. त्यामुळे वामिकाचा वाढदिवस पण खास होईल.
विराट कोहलीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण ९७ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५०.६ च्या सरासरीने ७८०१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २७ शतके आणि २७ अर्धशतके झळकावले आहेत. तसेच २५४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. परंतु, विराट कोहलीला २०१९ नंतर एकही शतक झळकावता आले नाहीये.
https://www.instagram.com/p/CVKserNswrb/
विराट कोहली मोडणार द्रविडचा विक्रम
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकण्यात यश आले नाहीय. त्यामुळे भारतीय संघ ही मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या १० कसोटी सामन्यात ५८ च्या सरासरीने ५५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि २ अर्धशतके झळकावले आहेत. तो दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज आहे, तर ६२४ धावांसह राहुल द्रविड दुसऱ्या स्थानी आहे. अशातच विराट कोहली त्याला मागे टाकू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सामन्यांना सुरुवात
जेव्हा सेहवागने १० गडी बाद करणाऱ्या एजाजला दिला होता चोप, स्वत: गोलंदाजानेच दिला आठवणींना उजाळा