पहिल्या वहिल्या अल्टिमेट खो-खो लीग स्पर्धेत आक्रमणाच्या आघाडीवर राजस्थान वॉरियर्सला तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांच्या इचलकरंजी मधील मजहर जामदार याने आक्रमणात जबरदस्त छाप पाडली आहे.
कोल्हापूरातील इचलकरंजी येथील मजहर जामदार (Majahar Jamadar) याच्या खेळाचा राजस्थानला जरुर दिलासा मिळाला. मात्र, सहकाऱ्यांकडून फारशी चांगली साथ न मिळाल्याने सांघिक कामगिरीत राजस्थानला मागे रहावे लागले आहे.
धारदार आक्रमणाने त्याने आतापर्यंत 52 गुणांची नोंद केली असून, तो आघाडीवर आहेत यात त्याने 9 स्काय डाईव्ह मारल्या आहेत. जामदारने मिळविलेलया 52 गुणांपैकी 48 गुण त्याने डाईव्हवर मिळविले आहेत. दोनवेळा त्याने सामन्यात सर्वोत्तम आक्रमकाचे पारितोषिक मिळविले आहे.
जामदारची कामगिरी राजस्थानसाठी महत्वाची ठरत असली, तरी त्यांना अजून विजयाची प्रतिक्षा आहे. आजच्या विश्रांतीनंतर आता उद्या तेलुगु योद्धाजविरुद्ध ते मैदानात उतरतील तेव्हा निश्चितच त्यांचा विजयासाठी प्रयत्न असेल यात शंका नाही.
अल्टीमेट खो खो स्पर्धेत चेन्नई क्विक गन्स, गुजरात जायंट्स, मुंबई खिलाडीज, ओडिशा जुगरनट्स, राजस्थान वॉरियर्स, तेलगु योद्धाज या सहा संघांचा समावेश आहे.
रविवारी, गुण तालिकेत आघाडीवर असलेल्या गुजरात जायंट्स संघ ओडिशा जुगरनट्स संघाशी सामना करणार आहे.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO। मुंबईच्या रस्त्यावर ‘विरुष्काची’ स्कूटर राईड! फॅन्स पासून वाचण्यासाठी वापरली खास आयडिया
जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर! फलंदाजांना मिळणार मोकळे रान
मोहम्मद शमीची नवी कोरी स्पोर्ट्स कार, किंमत आणि फिचर्स जाणून व्हाल थक्क