---Advertisement---

कोल्हापूर ताडोबा टायगर्सचा स्पर्धेतील सर्वात मोठा विजय

On: मंगळवार, एप्रिल 4, 2023 2:43 PM
Kabaddi
---Advertisement---

कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध लातूर विजयनगारा विर्स यांच्या झालेल्या लढतीत कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने जोरदार खेळ करत लातूर विजयनगारा विर्स संघावर अशी मात केली. पहिल्या सात मिनिटामध्येच लातूर संघावर लोन पडत कोल्हापूर संघाने आघाडी मिळवायला सुरुवात केली. कोल्हापूरच्या तेजस पाटील पाचवा सुपर टेन करत संघाला मध्यंतरा पर्यत 34-17 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरा नंतरही कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने आपला झंझावात खेळ सुरू ठेवला. तेजस पाटील ने शिवम पटारेचा एकाच सामन्यात चढाईत 26 गुण मिळवण्याचा रेकॉर्ड मोडीत काढत तब्बल 30 गुण मिळवले. लातूर संघावर 6 वेळा ऑल आऊट होण्याची नामुष्की ओढावली.

कोल्हापूर संघाने 77-22 असा एकतर्फी सामना जिंकत प्रमोशन फेरीसाठी आपल्या आशा कायम ठेवल्या. कोल्हापूर कडून तेजस पाटील सोबत ओमकार पाटीलने सुपर टेन तर दादासो पुजारीने 6 पकडी करत हाय फाय पूर्ण केला. तर लातूरच्या सचिन राठोडने 11 गुण मिळवत एकाकी झुंज दिली.

बेस्ट रेडर- तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेडर- दादासो पूजारी, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
कबड्डी का कमाल- ओमकार पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
(Kolhapur Tadoba Tigers’ biggest win of the tournament)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

याला म्हणतात धोनी प्रेम! ‘माही’ला टीव्हीवर पाहताच चाहत्याने ओवाळली आरती, व्हिडिओ तुफान व्हायरल
शेवटच्या सामन्यात पालघर काझीरंगा रहिनोस संघाची रायगड मराठा मार्वेल्स संघावर मात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---