के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या सहाव्या दिवशी चौथ्या क्रमांकवर असलेल्या रायगड मराठा मार्वेल्स व सहाव्या क्रमांकावर असलेल्या पालघर काझीरंगा रहिनोस यांच्यात महत्वपूर्ण लढत झाली. दोन्ही संघाना प्ले-ऑफस साठी पात्र होण्यासाठी सामना जिंकणे महत्वाचे होते. दोन्ही संघानी सावध पवित्रा घेत खेळ केला.
मध्यंतरापर्यत कोणत्याही संघाला मोठी आघाडी मिळवता आली नाही. कधी रायगड पुढे तर कधी पालघर पुढे जात होता. रुतिक पाटील व प्रशांत जाधवच्या चपळ चढाया करत रायगड संघाला 17-14 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरा नंतर पालघर संघावर लोन टाकत रायगड संघाने आघाडी मिळवली.
रायगड मराठा मार्वेल्सच्या चढाईपटूंनी व बचावपटूंनी सांघिक खेळ करत संघाची आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र राज साळुंखेच्या आक्रमक खेळाने रायगड संघाला ऑल आऊट करत पालघर संघाने शेवटची 2 मिनिट शिल्लक असताना 33-32 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर रायगडच्या रुतिक पाटीलने 2 गुण मिळवत रायगड संघाला 34-33 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शेवटच्या डु और डाय रेड मध्ये पालघरच्या कर्णधाराने 3 गुण मिळवत पालघर काझीरंगा रहिनोस संघाला 36-34 असा विजय मिळवून दिला.
बेस्ट रेडर- राज साळुंखे, पालघर काझीरंगा रहिनोस
बेस्ट डिफेंडर- जित पाटील, पालघर काझीरंगा रहिनोस
कबड्डी का कमाल- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
(Palghar Kaziranga Rhinos beat Raigad Maratha Marvels in the final decider)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही सगळी जबाबदारी तिलकवर टाकू शकत नाहीत…’, भारतीय दिग्गजाने मुंबई इंडियन्सला सुनावले खडेबोल
ऋतुराजच्या षटकारामुळे महागड्या गाडीवर पडला डेंट, आता मिळणार 5 लाख रुपये; कारण घ्या जाणून