---Advertisement---

प्रमोशन फेरीत कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाचा विजय

On: गुरूवार, एप्रिल 20, 2023 9:16 PM
Kabaddi
---Advertisement---

कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध नांदेड चांबल चॅलेंजर्स यांच्यात प्रमोशन फेरीची तिसरी लढत झाली. कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने आक्रमक सुरवात करत पहिल्या 10 मिनिटात नांदेड संघावर लोन पाडला. कोल्हापूरच्या तेजस पाटील व ओमकार पाटील यांनी चतुरस्त्र चढाया करत सामन्यात पकड मिळवली.

मध्यांतर पर्यत मुंबई शहर संघाकडे 24-16 अशी आघाडी होती. कोल्हापूर संघाकडे होती. तेजस पाटील ने सुपर टेन पूर्ण करत संघाला आघाडी मिळवून दिली. कोल्हापूर संघाने 3 वेळा नांदेड संघाबर लोन पाडत सामना एकतर्फी लढत बघायला मिळावी. नांदेड कडून अक्षय सूर्यवंशी एकटाच लढाई देत होता.

कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने 50-31असा सामना जिंकला. कोल्हापूर संघाकडून तेजस पाटीलने चढाईत 16 तर पकडीत 2 गुण मिळवले. तर ओमकार पाटील ने सुद्धा सुपर टेन पूर्ण केला. वैभव राबाडे व साईप्रसाद पाटील यांनी हाय फाय पूर्ण करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. नांदेड कडून अक्षय सूर्यवंशी ने 14 गुणांची खेळी केली. (Kolhapur Tadoba Tigers win in promotion round)

बेस्ट रेडर- तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेंडर- साईप्रसाद पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
कबड्डी का कमाल- ओमकार पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

प्रमोशन फेरीत अहमदनगर पेरियार पँथर्सची विजयी सुरुवात
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाची मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघावर मात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---