पुणे (23 मार्च 2023) – आजचा शेवटचा सामना जवळचे प्रतिस्पर्धी कोल्हापूर विरुद्ध सांगली यांच्यात झाला. कोल्हापूर संघ गुणतालिकेत 4 विजयासह दुसऱ्या स्थानी होता. तर सांगली संघ गुणतालिकेत 2 विजयासह सहाव्या स्थानावर होता. कोल्हापूर संघाने आक्रमक खेळ करत जोरदार सुरुवात केली. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला सांगली संघाला ऑल आऊट केले. कोल्हापूरच्या ओमकार पाटील ने चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवले. तर कोल्हापूरच्या उर्वरीत पाच खेळाडूंनी गुण मिळवत आपला खात उघडला होता.
सांगली ऑल आऊट झाल्यानंतर दोन्ही संघानी सावध खेळ केला. डू और डाय रेड दोन्ही संघ खेळले. मध्यंतरा पूर्वी कोल्हापूर संघाकडून साहिल पाटील ने चढाईत आक्रमक खेळ करत गुण मिळवले. साईप्रसाद पाटील व वैभव राबाडे यांनी बचावत महत्वपूर्ण पकडी करत गुण मिळवत सांगली संघावर पुन्हा एकदा लोन पडत 24-10 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरा नंतर ही कोल्हापूर संघाने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. कोल्हापूरच्या तुम्ही चढाईटपटूंनी आळीपाळीने गुण मिळवत संघाचे गुणफलक धावते ठेवले होते.
कोल्हापूरच्या साहिल पाटील व सौरभ फगारे यांनी सुपर टेन पूर्ण करत कोल्हापूर संघाला 47-32 असा विजय मिळवला. कोल्हापूर कडून साहिल पाटील ने चढाईत 12 तर सौरभ फगारे ने चढाईत 13 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. साईप्रसाद पाटील व वैभव राबाडे यांनी पकडीत प्रत्येकी 3 गुण मिळवले. सांगली कडून अभिषेक गुंगे व अभिराज पवार यांनी सुद्धा सुपर टेन पूर्ण केला. (Kolhapur team beat Sangli team, Kolhapur remained in second position)
बेस्ट रेडर- अभिषेक गुंगे, सांगली
बेस्ट डिफेंडर- साईप्रसाद पाटील, कोल्हापूर
कबड्डी का कमाल – सौरभ फगारे, कोल्हापूर
महत्वाच्या बातम्या –
प्रमोशन फेरीत मुंबई शहर संघाचा पहिला विजय
प्रमोशन फेरीत नंदुरबार संघाची पालघर संघावर मात