पुणे (17 मार्च 2024)- के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज ‘ब’ गटातील संघाच्या 6 लढती पूर्ण झाल्या. कोल्हापूर संघाने अटीतटीच्या लढतीत सांगलीचा संघाचा पराभव करत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. तर सातारा संघाने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. नंदुरबार संघाने पाचवा विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तर पालघर विरुद्ध नाशिक सामना बरोबरीत राहिला. कोल्हापूर संघाने प्रमोशन फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले असून उर्वरित 3 जागांसाठी 4 संघात चुरस आहे.
आजच्या पहिल्या सामन्यात सातारा संघाने धाराशिव संघाला पराभव करत 32-25 असा जिंकला. सातारा संघाचा हा पहिला विजय होता तर धाराशिव संघाचा हा सलग सहावा पराभव झाला. सातारा कडून कुणाल जाधव ने चढाईत 7 गुण मिळवले तर गणेश आवळे ने अष्टपैलू खेळ करत 8 गुण मिळवले. आज झालेल्या दुसऱ्या लढतीत कोल्हापूर संघाने अटीतटीची लढतीत सांगलीचा 35-28 असा पराभव केला. कोल्हापूरच्या सौरभ फगारे ने चढाईत सर्वाधिक 16 गुण मिळवले. तर वैभव राबाडे ने उत्कृष्ट पकडीत करत 4 गुण मिळवले.
आजचा तिसरा सामना पालघर विरुद्ध नाशिक यांच्यात झाला. 9-0 अश्या सुरुवाती नंतर पालघर संघाला मध्यंतराला 22-23 असा पिछाडी वर टाकत नाशिक संघाने जोरदार पलटवार केला. मध्यांतरा नंतर सामना अत्यंत चुरशीचा झाला. अखेर सामना 41-41 असा बरोबरीत राहिला. तर आजच्या शेवटचा सामना नंदुरबार संघाने 52-23 असा जिंकत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. परंतु अजूनही प्रमोशन फेरीतील त्यांचे स्थान निश्चित झाले नाही. (Kolhapur team enters the promotion round, 3 teams square for the remaining 3 seats)
संक्षिप्त निकाल-
सातारा 32 – धाराशिव 25
सांगली 28 – कोल्हापूर 35
पालघर 41 – नाशिक 41
नंदुरबार 52 – लातूर 23
महत्वाच्या बातम्या –
‘मी यासाठी आयुष्यभर धोनीचा आभारी राहीन…’, वाचा अश्विन नक्की कशाविषयी बोलतोय
WPL Final । नाणेफेकीत मेल लेनिंगची बाजी, या प्लेइंग इलेव्हनसह दोन्ही संघ फायनलसाठी सज्ज