कोलकाता। आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा हा निर्णय चूकीचा ठरवत 20 षटकांच्या आतच 6 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानेही(Rohit Sharma) क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करताना शानदार एकहाती झेल(One-Handed Catch)घेतला आहे.
रोहितने बांगलादेशचा कर्णधार मोमीनुल हकचा उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एकहाती झेल घेतला आहे.
झाले असे की पहिल्या डावातील 11 व्या षटकात उमेशने टाकलेला पहिला चेंडू मोमीनुलच्या बॅटची कड घेऊन स्लिपच्या दिशेने गेला. यावेळी दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहितने चपळाईने उजव्या बाजूला हवेत उडी घेत एका हाताने शानदार झेल घेतला.
त्यावेळी पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीनेही रोहितला कव्हर दिला होता. पण रोहितने कोणतीही चूक न केल्याने बांगलादेशला त्यांची दुसरी विकेट गमवावी लागली.
A Flying Jatt should be replace as 'A FLYING SHARMA' #PinkBallTest #INDvBAN #RohitSharma https://t.co/O5jeyuJPS6 via @bcci
— Akhil Gupta ???? (@Guptastats92) November 22, 2019
https://twitter.com/imRAVIranwa45/status/1197800839651266560
त्यानंतरही बांगलादेशने नियमित कालांतराने विकेट गमावल्या. त्यामुळे बांगलादेशची धावसंख्या पहिल्या सत्रानंतर 21.4 षटकांनंतर 6 बाद 73 धावा अशी झाली आहे. पहिल्या सत्रापर्यंत भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इशांत शर्माने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.
कोहलीसह टीम इंडियाच्या ११ खेळाडूंचे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले जाणार https://t.co/fcE63zqu7T#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest
— Maha Sports (@Maha_Sports) November 22, 2019
टॉप ५: ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भारतीय खेळाडू करु शकतात हे खास ५ विक्रम
वाचा???? https://t.co/WwGUbDhtLK????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest— Maha Sports (@Maha_Sports) November 22, 2019






