आयपीएल 2025 पूर्वी दररोज अनेक अपडेट पाहायला मिळत आहेत. दरम्यान आताच्या घडीची आयपीएल संर्दभातील मोठी बातमी समोर येत आहे. जे की चेन्नई आणि कोलकता संघाच्याबाबतीत आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा बाॅलिंग कोच ड्वेन ब्राव्होने सीएसके कॅम्पची रजा घेतली आहे. एमएस धोनीच्या विश्वासू क्रिकेटपटू चॅम्पियन ब्राव्हो आता केकेआर संघाला जोडला आहे. वास्तविक ड्वेन ब्राव्हो आयपीएल 2025 साठी कोलकाता नाइट रायडर्समध्ये मेंटॉर म्हणून सामील झाला आहे. त्याने गाैतम गंभीरच्या जागेची पूर्तता केली आहे. मागील हंगामात गाैतम गंभीरच्या मार्गदर्शनखाली संघाने जेतेपद पटकावले होते.
🚨 BREAKING 🚨
Reigning IPL Champions, Kolkata Knight Riders have appointed the legendary West Indies all-rounder Dwayne Bravo as their mentor from IPL 2025 onwards 🏏🟣#DwayneBravo #KKR #IPL2025 #Mentor #Sportskeeda pic.twitter.com/th0chQo62j
— Sportskeeda (@Sportskeeda) September 27, 2024
कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये खेळाडू म्हणून खेळत असलेल्या ब्राव्होने स्पर्धेच्या मध्यावर निवृत्ती जाहीर केली. त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर लगेचच केकेआरने अधिकृतपणे त्याच्या मेंटरशिपची घोषणा केली. ब्राव्हो आता 41 वर्षांचा होणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या बातमीनुसार, ब्रावोने सीपीएलच्या मध्यावर केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांची भेट घेतली होती. त्रिनबागो नाईट रायडर्स, लॉस एंजेलिस नाइट रायडर्स आणि अबू धाबी नाइट रायडर्स या सर्व फ्रँचायझी संघांचे नेतृत्व ब्राव्होकडे असेल.
दरम्यान ब्राव्हो म्हणाला, ‘मी 10 वर्षांपासून त्रिनबागो नाईट रायडर्सशी निगडीत आहे आणि इतर टी20 लीगमध्ये नाइट रायडर्सविरुद्ध खेळलो आहे, आयपीएलमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीचा मी आदर करतो. त्यामुळे 2022 मध्ये ब्राव्होने निवृत्तीची घोषणा केली होती खेळाडू, त्यानंतर तो 2023 आयपीएल मध्ये सीएसकेचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. त्यानंतर सीएसकेने विजेतेपद पटकावले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ब्राव्हो तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा-
ind vs ban; टीम इंडियाचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; संघात मोठे बदल!
आयपीएल 2025 मध्ये सामन्यांची संख्या वाढणार? बीसीसीआयचा मोठा निर्णय!
रिषभ पंतसाठी एमएस धोनीला मागे टाकणे सोपे नाही, या बाबतीत माही टाॅपवरच..