इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या हंगामातील १४वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात बुधवारी (०६ एप्रिल) खेळला जाणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर पार पडणार आहे. हा कोलकाताचा चौथा सामना आहे. त्यांनी तीन सामन्यांमधील २ सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करला आहे. मुंबई संघ या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न करेल. (Kolkata Knight Riders have won the toss and have opted to field)
तत्पूर्वी, भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कोलकाता संघात दोन बदल झाले आहेत. या सामन्यात रसिख सलाम कोलकाता संघाकडून आपले आयपीएल पदार्पण करत आहे. त्याला शिवम मावीच्या बदल्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. तसेच, पॅट कमिन्सही संघात सामील झाला आहे.
#KKR have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians
Live – https://t.co/qFLVoCfqRk #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/nn7JCyXgKG
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
दुसरीकडे मुंबई संघातील बदलांविषयी बोलायचं झालं, तर मुंबईतही २ बदल झाले आहेत. सूर्यकुमार यादवला अनमोलप्रीत सिंगच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच, ‘बेबी एबी’ म्हणजेच डेवाल्ड ब्रेविस टीम डेविडच्या जागी संघात सामील झाला आहे.
विशेष म्हणजे, उभय संघात झालेल्या मागील १० सामन्यात मुंबईने ८ वेळा विजय मिळवला आहे, तर कोलकाताने २ वेळा विजय मिळवला आहे.
असे आहेत संघ
कोलकाता नाईट रायडर्स- अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम आणि वरुण चक्रवर्ती.
मुंबई इंडियन्स- इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बेसिल थम्पी.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबी @100! राजस्थानविरुद्धचा विजय बेंगलोरसाठी विशेष; मुंबई-चेन्नईच्या पंक्तीत मिळाले स्थान
‘त्यावेळी धोनीने ताहीरला काय सांगितले माहित नाही, पण माझा झेल गेला’, इशान किशनने सांगितला किस्सा
IPL 2022| राजस्थानला मोठा धक्का; संघातील ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू १५व्या हंगामातून बाहेर






