अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात कोलकाता संघाने ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवत कोलकाता संघाने ४ गुणांसह गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. तसेच या सामन्यात कोलकाता संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि पूर्व कर्णधार दिनेश कार्तिक याचा विशेष कारणासाठी सन्मान करण्यात आला होता.
कोलकाता संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने गेल्या काही वर्षांपासून कोलकाता संघाच्या अनेक विजयात मोलाची भुमिका बजावली आहे. तसेच पंजाब संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याचा सन्मान करण्यात आला होता. कारण हा सामना त्याच्यासाठी अत्यंत खास होता. दिनेश कार्तिक ५० व्या वेळेस कोलकाता संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे संघ सहकारी अभिषेक नायरच्या हातून त्याला कोलकाता संघाची कॅप देण्यात आली होती. हा व्हिडिओ कोलकाता संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
It is @DineshKarthik's 50th #VIVOIPL match for @KKRiders today and he gets a 🧢 from @abhisheknayar1 to mark the occasion. https://t.co/sBoaBIpF2J #PBKSvKKR #VIVOIPL pic.twitter.com/amSVaiiul2
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2021
दिनेश कार्तिकची आयपीएल कारकीर्द
दिनेश कार्तिकने २००८ साली आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. नुकताच त्याने आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये २०२ सामने खेळले आहेत. यात त्याने ३९३२ धावा केल्या आहेत. यात त्याने १९ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच नाबाद ९७ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासोबतच त्याने १०८ षटकार आणि ३८९ चौकार लगावले आहेत.
त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१८ पासून ते आतापर्यंत तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मन जिंकलस भावा! सामना झाल्यानंतर केकेआरच्या कर्णधाराचे हृद्यास भिडणारे भाष्य, एकदा वाचाच
सनराझर्समागचं दृष्टचक्र संपेना, संघ पिछाडीवर असताना कर्णधार उर्रवित हंगामातून घेणार माघार?
Video: जॉर्डनने दोन षटकार मारल्याने चिडला प्रसिद्ध कृष्णा, विकेट घेतल्यानंतर दाखवली ‘दादागिरी’!