2025च्या आयपीएल (Indian Premier League) हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी आयपीएल हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलाताना दिसणार आहेत. त्यापूर्वी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) रिटेंशन पाॅलिसी जाहीर केली आहे. त्यामध्ये एक संघ 5 खेळाडूंना संघात कायम ठेवू शकतो, तर एक ‘राईट टू मॅच’ पर्याय देखील वापरू शकतो. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण 2024च्या विजेतेपदावर नाव कोरलेला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ कोणत्या 3 स्टार खेळाडूंना लिलावाआधी रिलीज करू शकतो, हे जाणून घेऊया.
फिल साल्ट- फिल साल्टने (Phil Salt) शेवटच्या आयपीएल हंगामात 12 सामन्यात 39.55च्या सरासरीने 435 धावा केल्या होत्या. त्याला जेसन राॅयच्या जागी संघात सामील केलं होतं. सुनील नारायण (Sunil Narine) सोबत त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांवर वारंवार वर्चस्व गाजवले होते. पण मेगा लिलावाआधी केकेआर त्याला रिलीज करू शकते.
मिचेल स्टार्क- मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हा जगातील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक आहे. शेवटच्या लिलावात स्टार्कवर केकेआरने 24.75 कोटी रुपयांची बोली लावली होती आणि त्याला आपल्या ताफ्यात सामील केले होते. पण आता त्याला कायम ठेवल्यास संघाच्या पर्समधील सुमारे 21 टक्के रक्कम आधीच कमी होईल. अशा स्थितीत केकेआरला उर्वरित 79 टक्के पैशांतून संघाची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी कोलकाता मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) संघातून वगळू शकते.
व्यंकटेश अय्यर- व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) 2021 पासून कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळत आहे. केकेआरसाठी त्याने 51 सामन्यांमध्ये 1,326 धावा केल्या आहेत. तरीही केकेआर त्याला लिलावापूर्वी संघातून रिलीज करू शकते. कारण एका संघाला 5 खेळाडू कायम ठेवण्याची आणि एका खेळाडूवर राईट टू मॅच कार्ड वापरण्याची परवानगी असणार आहे आणि कोलकाताला अशा परिस्थितीत स्टार खेळाडूंवर जम बसवणे अवघड जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
SL vs NZ; कोण आहे हा फिरकीपटू? पदार्पण सामन्यातच घेतल्या 9 विकेट्स
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 600+ धावा करणारे टाॅप-5 संघ
IPL 2025; “आरसीबी फक्त कोहलीलाच रिटेन करणार” माजी खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य