---Advertisement---

केकेआरच्या खेळाडूंची ‘क्वारंटाईन अंतक्षरी’ पाहिली का? व्हिडिओ पाहून होईल पैसावसूल मनोरंजन

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 11:26 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व संघांची जोरदार तयारी चालू आहे. प्रत्येक संघ आता यूएईला जाण्याची तयारी करत आहेत. तर यातील काही संघ यूएईला पोहोचले देखील आहेत. आयपीएलचा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघसुद्धा यूएईला पोहोचला आहे. सध्या ते ६ दिवसांच्या विलगीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. यादरम्यान केकेआरने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विलगीकरणात असताना खेळाडू आभासी अंताक्षरी खेळत असल्याचे दिसत आहे.

मात्र हा व्हिडिओ यावर्षीचा नसून मागच्या वर्षीच्या (२०२०) आयपीएलपूर्वीचा आहे. रविवारी (२९ ऑगस्ट) केकेआरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिक, शुभमन गिल, कुलदीप यादव आणि नितीश राणासह इतर खेळाडू आभासी अंताक्षरी खेळत आहेत. यामध्ये अभिषेक नायरने आयोजकाची भूमिका साकारली आहे. यासाठी खेळाडूंना २ गटांमध्ये विभागले आहे. तसेच या खेळाचे नियम देखील थोडेसे मजेशीर आहेत. जो गट शाहरुख खानच्या चित्रपटातील गाणं गाईल त्याला ६ अंक दिले गेले. तर इतर गाण्यांसाठी गटाला केवळ ४ अंक मिळतात. केकेआर संघ शाहरुख खानच्या सह मालकीचा आहे, त्यामुळे अशी गुणपद्धती अवलंबण्यात आली.

यामध्ये केकेआरचे सर्व खेळाडू अत्यंत मजेशीरपणे त्यांचा विलगीकरणाचा काळ व्यतीत करताना दिसत आहेत. केकेआरने खेळाडूंच्या गेल्या वर्षीचा अंताक्षरीचा हा व्हिडिओ शेअर करत, “परफेक्ट क्वारंटाईन अंताक्षरी, परफेक्ट रविवारी परफेक्ट अंताक्षरी. आमच्या नाइट्ससाठी एसआरके (शाहरुख खान) चे गाणे,” असे कॅप्शन देखील दिले आहे.

https://www.instagram.com/tv/CTJsMRjFtDK/?utm_source=ig_web_button_share_sheet

दरम्यान यंदा केकेआरने पॅट कमिन्सच्या ऐवजी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीला दुसऱ्या टप्प्यासाठी संघात सामील केले आहे. पॅट कमिन्सने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून आपले नाव मागे घेतले होते. ज्यामध्ये त्याने वैयक्तिक कारण सांगत यातून माघार घेतली होती. म्हणून केकेआरने साऊदीला संघात सामील केले.

साऊदीचा हा करार अशा वेळेत झाला, जेव्हा न्युझीलंड संघाला बांगलादेश आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी जायचे आहे. मात्र यावरून साऊदी न्यूझीलंडसोबत पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट होते.

साऊदी याआधीही आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल संघाकडून खेळला आहे. आता तो केकेआर कडून खेळणार आहे. मात्र, आयपीएलमध्ये साऊदीचे म्हणावे तसे प्रदर्शन राहिले नाही. आतापर्यंतच्या ४० सामन्यात साऊदीने केवळ २८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याचा इकॉनॉमी रेट देखील ८.७४ एवढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय फलंदाजांचा समाचार घेणारा इंग्लंडचा ‘हा’ अनुभवी गोलंदाज कसोटी मालिकेनंतर घेणार निवृत्ती
विरोधी संघाच्या दिग्गजाचा भारताला मदतीचा हात, फलंदाजी बळकट करण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला
स्कॉटलंडची टी२०त प्रशंसनीय कामगिरी, फ्रान्सला अवघ्या २४ धावांवर गुंडाळत ७ विकेट्सने जिंकला सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---