लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) १४ धावांनी विजय मिळवला. यासह आरसीबीने त्यांचे क्वालिफायर २ चे तिकीट पक्के केले आहे. युवा रजत पाटीदार आरसीबीच्या या विजयाचा शिल्पकार राहिला. या सामन्यादरम्यान एक मजेदार घटना घडली. ज्यामध्ये कोलकाता पोलीसच्या एका कर्मचार्याचा डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टारसारखा अंदाज दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय घडली घटना
कोलकाता येथील या एलिमिनेटर सामन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली. हा सामना चांगलाच रंगला. ज्यामध्ये शेवटी आरसीबीने विजय संपादन केला. त्याचवेळी सामन्याच्या दुसऱ्या डावात एक मजेदार घटना पाहायला मिळाली. लखनऊ धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहलीचा एक चाहता मैदानात घुसला. त्याला विराटला भेटायचे होते. या चाहत्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, इतक्यात मैदानात एंट्री झाली पांढर्या पोषाखातल्या कोलकाता पोलिसाच्या एका कर्मचाऱ्याची. त्याने त्या प्रेक्षकाला इतक्या अलगदपणे उचलून खांद्यावर घेतले की, जसे डब्ल्यूडब्ल्यू सुपरस्टार जॉन सीना घेतो. त्यानंतर विराट कोहलीने देखील चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी काही हावभाव केले. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होऊ लागला आहे.
📷 @imVkohli loved the way that ground security picked up and carried away this pitch invader at Eden Gardens last night 😂😂 #IPL2022 https://t.co/IHHypOdHFr
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) May 26, 2022
असा रंगला सामना
पावसाच्या व्यत्ययामुळे काहीसा उशिरा सुरू झालेल्या या एलिमीनेटर सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकला. आरसीबीचा युवा फलंदाज रजत पाटीदार याने नाबाद शतक झळकावले. तर, त्याला दिनेश कार्तिकने सुयोग्य साथ दिली. प्रत्युत्तरात लखनऊसाठी कर्णधार केएल राहुल व दीपक हुडा यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघेही बाद झाल्यानंतर बाकीच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या पराभवामुळे लखनऊचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर आरसीबी, राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.
महत्वाच्या बातम्या-
Eliminator | पराभवानंतर गौतमचे केएल राहुलसोबत ‘गंभीर मंथन’, अँग्री लूकचा फोटो तुफान व्हायरल
इंतजार खत्म! तब्बल सात वर्षांनंतर आरसीबीच्या वाट्याला आला तो क्षण
क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद