सेऊल येथे चालू असलेल्या कोरिया ओपन स्पर्धेत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने उपउपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे.
सहा लाख अमेरिकन डॉलरचे बक्षिस असलेल्या या स्पर्धेत सायनाने कोरियाच्या किम ह्यो मिनहिचा पराभव केला. किम सायनाचा प्रतिकारच करू शकली नाही. 21-12,21-11 असा सरळ सेट मध्ये तिचा पराभव केला.
या भारताच्या माजी नंबर 1 च्या खेळाडूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच 18 एशियन गेम्समध्ये तिने कांस्य पदक जिंकलेल्या साईनाचा पुढचा सामना किम गा यून या कोरियाच्याच स्थानिक खेळाडू सोबत होणार आहे.
सायनाला पहिल्या फेरीत जास्त स्पर्धेचा सामना करावा लागला नाही. सुरूवातीला 6-2 अश्या आघाडीवरून तिने 12-3 अशी मजल मारत आपली छाप सोडत. पहिला सेट आपल्या नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्येही साईना वरचढ ठरली. तिने 5-2 दोन अशी सुरुवात करत सामना आपल्या बाजूने खेचला होता. किमने प्रतिकार करत 18-10 अशी आघाडी कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.मात्र त्याचा जास्त फायदा होऊ शकला नाही.