---Advertisement---

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेस 17 नोव्हेंबरपासून प्रारंभ

On: मंगळवार, नोव्हेंबर 13, 2018 5:03 PM
---Advertisement---

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे पुण्यात येत्या 17ते24  नोव्हेंबर दरम्यान म्हाळुंगे बालेवाडी संकुलात हि स्पर्धा रंगणार आहे. हि स्पर्धा सलग पाचव्या वर्षी होत असून यामध्ये अव्वल भारतीय खेळाडूंसह 20हुन अधिक देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

पीएमडीटीएचे अध्यक्ष, संयोजन समितीचे अध्यक्ष आणि केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील म्हणाले की, आम्ही सलग पाचव्या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना आपल्या मानांकनात प्रगती करता येते. तसेच टेनिसमधील त्यांची कारर्किद घडविण्यास या स्पर्धेचा उपयोग होतो, याचा मला विशेष आनंद आहे. तसेच, या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय आणि आशियाई खेळाडूंना पुरस्कृत करण्याचे आमचे लक्ष यशस्वी होत असल्याचाही मला आनंद वाटतो.

तसेच, गेली चार वर्षे आमच्या या स्पर्धेतील विजेते हे अव्वल 100खेळाडूंच्या क्रमवारीत आगेकूच करत आहेत. त्यामुळे यावर्षीदेखील या स्पर्धेमुळे विजेत्याला अव्वल 100खेळाडूंच्या क्रमवारीत आगेकूच करण्यास मदत होईल, अशी आशा असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा जगभरात लोकप्रिय होत चालली असून ही अधिक भव्य आणि दर्जेदार खेळाडूंचा सहभाग यामुळे या स्पर्धेचा स्तर दरवर्षी उंचावत आहे. यंदाचा कट ऑफ 270 असा असून त्यामुळे ही स्पर्धा या स्तरावर अतिशय चुरशीची होणार आहे. 

आम्हीएटीपी चॅलेंजर कॅलेंडरवरील हि चॅलेंजर्स स्पर्धा दरवर्षी सातत्यपणे आयोजित करत असल्याने एटीपीकडूनही आम्हांला सन्मान मिळाला आहे, तसेच आता भारतात बंगलोर आणि चेन्नईमध्ये देखील आणखी दोन या चॅलेंजर्स स्पर्धा होत असल्यामुळे आम्हांला याचा आनंद होत आहे आणि या चॅलेंजर्स स्पर्धा आमच्या भारतीय खेळाडूंसाठी हि काळाची गरज आहे. आम्हांला किमान 8 ते 10 भारतीय खेळाडू मुख्य ड्रॉ आणि पात्रता फेरीत खेळणे अपेक्षित आहे आणि या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी घरच्या मैदानावर लढण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

अँड्री कोर्निलोव्ह यांची एटीपी सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नितीन कन्नमवार यांची एटीपी रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 17 व 18 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य फेरीस 19नोव्हेंबर रोजी होणार आहेत. स्पर्धेचे उपांत्य व दुहेरीचा अंतिम फेरीचा सामना शुक्रवार, दि.23 नोव्हेंबर रोजी होणार असून शनिवार, दि.24 नोव्हेंबर रोजी एकेरीच्या अंतिम फेरीचा सामना होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 7200डॉलर(5,25,000रूपये) व 80एटीपी गुण, तर उपविजेत्याला 4053डॉलर(2,95,000रूपये)व 55 एटीपी गुण देण्यात येणार आहेत. याशिवाय या स्पर्धेबरोबरच विविध कार्यक्रम यांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील विजेतेः
एकेरी गटः 

2017: युकी भांब्री(भारत)वि.वि.रामकुमार रामनाथन(भारत) 4–6, 6–3, 6–4  
2016ः सादिओ डंबिया(फ्रांस)वि.वि.प्रजनेश गुन्नेस्वरण 4-6, 6-4, 6-3;
2015ः युकी भांब्री(भारत)वि.वि.एव्हेग्नी डॉंस्काय(रशिया)6-2, 7-6(7-4);
2014ः युईची सुगिता(जपान)वि.वि.एड्रियन मेनेडेझ-मॅसिरस(स्पेन)6-7(1-7), 6-4, 6-4; 


दुहेरी गटः 

2017: तोमीस्लाव्ह ब्रेकिक/अँटी पाविक वि.वि.पेड्रो मार्टिनेझ/अँड्रियन मेनेनडेझ मॅसिअर्स 6-1,7-6(5)  
2016ः पुरव राजा/दिविज शरण(भारत)वि.वि.लुका मार्गोली/हुगो न्यास(फ्रांस)3-6, 6-3, 11-9;
2015ः गेरार्ड ग्रॅनोलर्स/ऍड्रियन मेनेडेझ-मॅसिरस(स्पेन)वि.वि.मॅक्सिलीअन न्युक्रिस्ट(ऑस्ट्रिया)/दिविज शरण(भारत)1-6, 6-3, 10-6;

2014ः साकेत मायनेनी/सनम सिंग(भारत)वि.वि.सँचाय/सोंचात रतीवत्ना(थायलंड)6-3, 6-2.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment