मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांती क्रीडा महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब तर प्रथम श्रेणीत जागर क्रीडा मंडळ, द्वितीय श्रेणी गटात जाखमाता क्रीडा मंडळ संघाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महिला गटात चेंबूर क्रीडा केंद्र मंडळ विरुद्ध महात्मा गांधी फुले स्पोर्ट्स यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. अंत्यत चुरशीचा झालेल्या सामन्यांत महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबने ३६-३४ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुष प्रथम श्रेणीत टागोर नगर मित्र मंडळवर ३४-२० असा विजय मिळवत सह्याद्री मित्र मंडळाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र दुसऱ्या फेरीत जागर मंडळाने चुरशीच्या सामन्यांत सह्याद्री मित्र मंडळाचा ३१-३० असा पराभव केला. नवरत्न क्रीडा मंडळाने ३८-२० असा साहसी कला मंडलवर विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.
पुरुष द्वितीय श्रेणीत निर्धास्त मंडळाने २५-१९ असा जय भवानी स्पोर्ट्स क्लबवर विजय मिळवला. नवरत्न क्रीडा मंडळ विक्रोळी संघाने मुक्ता देवी विकास संघाला २०-१४ असे नमावले. तर अरुणोदय क्रीडा मंडळ विरुद्ध कादवड युवक क्रीडा मंडळ यांच्यात झालेल्या लढतीत अरुणोदय क्रीडा मंडळाने २१-१४ अशी बाजी मारली.





