---Advertisement---

‘काही लोकांसाठी मुंबई म्हणजेच सर्वकाही,’ पाहा कुणावर साधला श्रीकांत यांनी निशाणा

On: बुधवार, ऑक्टोबर 28, 2020 6:51 PM
---Advertisement---

बीसीसीआयने सोमवारी (२६ ऑक्टोबर) येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या भारतीय कसोटी संघात केएल राहुलला स्थान दिले. त्यानंतर संजय मांजरेकरांनी राहुलच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत यांनी मांजरेकरांना चांगलेच सुनावलं आहे.

केएल राहुलविषयी ट्विट करत मांजरेकरांनी लिहिले होते की, “जर तुम्ही आयपीएलमधील प्रदर्शनाच्या आधारावर कोणत्या खेळाडूची कसोटी संघात निवड करत असाल, तर हे पुर्णपणे चुकीचे आहे. त्यातही तुम्ही निवडलेला खेळाडू यापुर्वीच्या काही कसोटी सामन्यात अयशस्वी ठरला आहे. अशी निवड करुन तुम्ही रणजीपटूंना निराश करत आहात.”

https://twitter.com/sanjaymanjrekar/status/1320911177493278722

 

मात्र श्रीकांत यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरील व्हिडिओत म्हटले की, “केएल राहुलच्या कसोटी निवडीवर प्रश्न? शक्यच नाही. त्याचे कसोटीतील प्रदर्शन प्रशंसनीय राहिले आहे. एवढेच नाही तर, त्याची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आकडेवारीही चांगली आहे. मांजरेकरांना दूसरं काही काम नाही. तुम्ही उगाच प्रश्न विचारुन भांडण लावू शकत नाहीत.”

“मांजरेकर मुंबईच्या पलीकडे दूसऱ्या गोष्टींचा विचार करत नाहीत. त्यांच्यासारख्या लोकांसाठी मुंबई म्हणजेच सर्वकाही असत. खरं तर त्यांनी मुंबईला सोडून दूसऱ्याही गोष्टींचा विचार करायला हवा,” असे शेवटी श्रीकांत यांनी म्हटले.

कसोटी क्रिकेटची आकडेवारी

कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत एकूण ३६ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३४.५९च्या सरासरीने २००६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ऑगस्ट २०१९ला वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘IPLच्या कामगिरीवर कधीपासून कसोटीत निवड होऊ लागली?’ राहुलच्या निवडीवरुन माजी क्रिकेटपटूचे ताशेरे

धडाकेबाज फलंदाजीनंतरही पृथ्वी शॉला संघात स्थान का दिले नाही? इंग्लंडच्या दिग्गजाने सांगितले कारण

‘विराट- शास्त्रींनी कट रचत रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून केले बाहेर?’ चाहत्यांचे गंभीर आरोप

ट्रेंडिंग लेख-

अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…

वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!

…आणि सचिनचे शब्द‌ हार्दिकने खरे करून दाखवले !

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---