काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्या कृष्णा नागरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी कृष्णाची आई इंद्रा नागर यांचे दुःखद निधन झाले आहे. शनिवारचा दिवस कृष्णासाठी विशेष होता, पण याच दिवशी त्याचे कधीच भरून न निघणारे नुकसान देखील झाले आहे. शनिवारी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात देशासाठी मोठी कामगिरी केलेल्या १२ खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले. या खेळाडूंमध्ये कृष्णाचेही नाव होते, पण अचानक ही दुःखद बातमी मिळाल्यामुळे तो हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहू शकला नाही.
शनिवारी कृष्णाला ही वाईट बातमी कळाल्यानंतर तो राष्ट्रपती भवनात न जाता जयपूरला परतला. कृष्णाची आई मागच्या पाच दिवसांपूर्वी त्यांच्या घराच्या छतावरून खाली पडली होती. त्यानंतर त्यांना जयपूरमध्येच एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच्यावर याठिकाणी उपचार चालू होते, पण शनिवारी त्यांची तब्येत अधिकच बिगडली आणि त्याचे निधन झाले.
दरम्यान, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या १२ खेळाडूंमध्ये राजस्थानच्या कृष्णा नागर आणि अवनि लेखरा या दोघांचा समावेश होत. मात्र, दुर्दैवाने कृष्णा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकला नाही. त्याव्यतिरिक्त शनिवारी देशासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये क्रिकेटपटू शिखर धवनचाही समावेश होता.
मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराने सन्मानित खेळाडू
नीरज चोप्रा (ऍथलेटिक्स), रवि कुमार दहिया (कुस्ती), लवलीना बोरगोहेन (बॅक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनि लेखारा (पॅरा शूटिंग), सुमित अंतिल (पॅरा ऍथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), कृष्णा नागर (पॅरा बॅडमिंटन), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंग (हाकी), मनीष नरवाल (पॅरा शूटिंग), मिताली राज (क्रिकेट)
अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडू
शिखर धवन (क्रिकेट), अरपिंदर सिंग (ऍथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॅक्सिंग), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखांब), अभिषेक वर्मा (शूटिंग), अंकिता रैना (टेनिस), दीपक पूनिया (कुस्ती), दिलप्रीत सिंग (हॉकी), हरमनप्रीत सिंग (हॉकी), रूपिंदर पाल सिंग (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी), विरेंद्र लाकडा (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंह (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंग (हॉकी), मनदीप सिंग (हॉकी), शमशेर सिंग (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंग (हॉकी), योगेश कथूनिया (पॅरा ऍथलेटिक्स), निषाद कुमार (पॅरा ऍथलेटिक्स), प्रवीण कुमार (पॅरा ऍथलेटिक्स), सुहाश यतिराज (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अधाना (पॅरा शुटिंग), हरविंदर सिंह (पॅरा तीरंदाजी), शरद कुमार (पॅरा ऍथलेटिक्स), भावना पटेल (पॅरा टेबल टेनिस)
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडला ‘अंडरडॉग’ म्हटल्यावर आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…
ट्राॅफीच्या डाव्या बाजूला उभं राहिलं की जिंकतंय? पाहा काय सांगतो आयसीसी विश्वचषकाचा इतिहास
घरवापसी! विराट पत्नी अनुष्का अन् लेकीसह युएईतून परतला मुंबईत, पाहा व्हिडिओ