क्रिकेट खेळात खेळाडू नेहमी स्वतःचा एक वेगळा लुक घेऊन येत असतात. खेळाबरोबरच त्यांची स्टाईल देखील आकर्षणाचा विषय बनते. आयपीएल ‘प्ले ऑफ’ सुरू होण्यापूर्वीच मुंबईचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपला लुक बदलला आहे.
जसप्रीत बुमराह आयपीएलमधील मुंबई संघाचा एक जुना व अनुभवी खेळाडू. भारतीय संघातही त्याने स्वतःचे स्थान मजबूत ठेवले आहे. बुमराहला खेळताना समोरील संघाला विशेष नियोजन करुनच मैदानात उतरावे लागते. विशेषतः धावांचा पाठलाग करताना बुमराहचा शेवटच्या षटकांचा सामना करण्यासाठी आधीच त्यांचे नियोजन ठरलेले असते.
खेळाबरोबरच खेळाडू आपले लुक आपली स्टाईल नेहमी बदलत असतात. बुमराह संपूर्ण हंगामात संपूर्ण दाढी व मिशीत खेळताना दिसला होता. आता त्याने आपली दाढी अर्धी कापली असून मिशी देखील एकदम हलकीशी ठेवली आहे. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कृनाल पांड्याने देखील त्याची तुलना एका फुटबॉलपटू सोबत केली आहे.
https://www.instagram.com/p/CHLDuzIncG2/
जसप्रीत बुमराहचे या हंगामातील कामगिरी
जसप्रीत बुमराहने मुंबई संघासाठी एकूण 13 सामने या हंगामात खेळले आहेत. ‘प्ले ऑफ’ पूर्वी विश्रांती म्हणून त्याला हैदराबाद विरोधातील शेवटच्या सामन्यात विश्रांती दिली होती. बुमराहने 13 सामन्यांत मुंबई संघासाठी सर्वाधिक 23 बळी घेतले आहेत. ‘पर्पल कॅप’ च्या यादीत तो रबडाच्या 25 विकेट्सनंतर दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईने त्याला 14व्या सामन्यात त्याला मुंबईने विश्रांती दिली. जर तो हा सामना खेळला असता तर रबाडाची बरोबरी करण्याची त्याला चांगली संधी होती. दरम्यान त्याच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.






