---Advertisement---

बिग ब्रेकिंग! आज होणारा दुसरा टी२० सामना रद्द? भारतीय संघातील ‘हा’ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

On: मंगळवार, जुलै 27, 2021 3:58 PM
---Advertisement---

भारताचा मर्यादीत षटकांचा संघ  श्रीलंका दौऱ्यावर असून सध्या टी२० मालिका सुरु आहे. यामालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (२७ जुलै) होणार होता. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दुसरा टी२० सामना स्थिगत करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जर अन्य सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना बुधवारी (२८ जुलै) होईल.

एएनआयशी बोलताना एका सुत्राने सांगितले की कृणालचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन्ही संघ अन्य सर्वांचे अहवाल येईपर्यंत आयसोलेशनमध्ये गेले आहेत. तसेच यामुळे आता सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांच्यासमोरच्या समस्याही वाढल्या आहेत. कारण, या दोघांनाही श्रीलंकेतून इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे.

सध्या भारताचा कसोटी संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. पण या दौऱ्यादरम्यान भारताचे ३ खेळाडू दुखापतग्रस्त झाले असल्याने शॉ आणि सूर्यकुमार यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे ते लवकरच इंग्लंडला रवाना होणार होते. मात्र, आता कृणालचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या मार्गातही अडथळा येण्याची दाट शक्यता आहे.

श्रीलंका दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचे संकट 
भारताच्या श्रीलंका दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाच्या संकटाने डोके वर काढलेले होते. या दौऱ्याचे वेळापत्रकही कोरोनामुळेच यापूर्वी एकदा बदलण्यात आले होते.

श्रीलंका संघ इंग्लंड दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्यांचे काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला अधिक काळ क्वारंटाईन राहावे लागले होते. परिणामी भारताविरुद्धची वनडे आणि टी२० मालिका पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील सामने १३ जुलै ऐवजी १८ जुलैपासून सुरु झाले होते. त्यानंतर वनडे मालिका सुरळीत पार पडली. भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली देखील. मात्र, टी२० मालिकेतील दुसरा सामना होण्यापूर्वी पुन्हा एकदा कोरोनाचा फटका बसल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?

द्रविड-शनाकाची गाठभेट ठरलेली सर्वांच्या आकर्षणाचा विषय, पण त्यांच्यात काय झालं बोलणं? वाचा

‘भज्जी’ची पत्नी गीता बसरानं दाखवली मुलाची पहिली झलक; नाव काय ठेवलंय माहितीये?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---