---Advertisement---

मैत्रीत पुन्हा पडली असती फूट! दीपक हुडामुळे कृणाल पंड्याचं लाईव्ह सामन्यात फिरलं डोकं

On: शनिवार, एप्रिल 30, 2022 1:23 PM
Hooda-Krunal-Video
---Advertisement---

आयपीएल २०२२चा ४२वा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळला गेला. लखनऊने २० धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान कृणाल पंड्या दीपक हुडावर नाराज असल्याचे दिसला. हुडा अतिशय धीम्या गतीने धाव घेत होता, ज्यामुळे तो धावबाद झाला. यावेळी दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या कृणाल मात्र त्याच्या या कृतीवर चिडला. लाईव्ह सामन्यातील या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. 

टी२० क्रिकेट हा जलद खेळ आहे. त्यामुळे फलंदाजांना उत्स्फुर्ती दाखवत झटपट धावा जोडाव्या लागतात. लखनऊ विरुद्ध पंजाब (LSG vs PBKS) सामन्यादरम्यान असेच काहीसे पाहायला मिळाले. लखनऊ संघाला वेगाने धावफलक पुढे नेण्याची आवश्यकता असताना हुडा (Deepak Hooda) धावा घेण्यात आळस करताना दिसला, ज्याचा पुरेपूर फायदा पंजाबने घेतला. पंजाबचा खेळाडू जॉनी बेयरस्टोने हुडाला धावबाद केले, ज्यामुळे कृणालचा (krunal Pandya) पारा चढला. म्हणून एकवेळ कृणाल आणि हुडा पुन्हा एकमेकांशी भिडतील अशी चित्रे दिसत होती.

ही घटना लखनऊच्या डावातील १४व्या षटकात घडली. अर्शदीप सिंगच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कृणाल पंड्याने पुल शॉट खेळला आणि २ धावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु नॉन स्ट्राईकवर असलेला हुडा जास्त वेगाने धावताना दिसला नाही. इतक्यात क्षेत्ररक्षक जॉनी बेयरस्टोने वेगाने चेंडू पकडला आणि अचूक नॉन स्ट्राईकवरील यष्ट्यांवर मारला. तोपर्यंत हुडाही क्रिजपर्यंत पोहोचू शकला नव्हता. परिणामी तो ३४ धावांवर धावबाद झाला. हे पाहून हळू धावणाऱ्या हुडावर कृणाल (Krunal Pandya Angry On Deepak Hooda) ओरडला.

https://twitter.com/AdityaK59738287/status/1520073725609054208?s=20&t=Q80rgyOtyMwd_55vFyS9GA

https://twitter.com/JamesTyler_99/status/1520058281707773952?s=20&t=-Yl_FhkPv5e5WmLxBO8stQ

दरम्यान २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेदरम्यान हुडा आणि कृणालचा वाद समोर आला होता. दीपकने बडोद्याचा कर्णधार कृणाल पंड्यासह वाद झाल्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून अचानक सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीतून माघार घेतली होती. दीपक संघाचा उपकर्णधार होता. त्याने कृणालवर आरोप केले होते, की त्याने त्याला सरावादरम्यान शिवागाळ केला. तसेच कारकिर्दीबाबत धमकी दिली आहे. यानंतर हुडावर बडोदा क्रिकेट असोसिएशनने संपूर्ण देशांतर्गत क्रिकेट हंगामातून निलंबनाची कारवाई केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

लखनऊने पंजाबला चारली धूळ, तरीही नाखुश आहे कर्णधार केएल राहुल; सांगितल्या चुका

आज कोट्यावधींचा मालक असलेल्या रोहितकडे एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, ‘अशी’ भागवायचा गरज

जेंटलमन गेमचा जेंटलमन क्रिकेटर! क्विंटन डी कॉकच्या ‘प्रामाणिकपणा’चे प्रतिस्पर्धी खेळाडूकडूनही कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---