विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना, भारताचा एक युवा संघ श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आले असून, दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविड या संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. या दौर्यावर भारतीय संघाला तीन सामन्यांची वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. सध्या कोलंबो येथे भारतीय संघ क्वारंटाईन असून, तेथून भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
कृणालने शेअर केला व्हिडिओ
दोन दिवसांपूर्वीच कोलंबो येथे पोहचल्यानंतर भारतीय संघ तीन दिवस सक्त क्वारंटाईन आहे. यादरम्यान खेळाडू विविधप्रकारे वेळ घालवताना दिसत आहेत. अष्टपैलू कृणाल पंड्या या काळात देखील सराव करताना दिसून आला. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. तसेच तो काही फिटनेस वर्कआउट देखील करताना आढळून आला. त्याने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले, ‘तुम्ही विचार केला तर तुम्ही कोठेही ट्रेनिंग घेऊ शकता.’
त्याने या व्हिडिओला पार्श्वसंगीत म्हणून एक तमिळ गाणे लावले आहे. त्याच्या चाहत्यांकडून या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळतेय.
https://www.instagram.com/p/CQu-2I7n-i1/
एकाच वेळी खेळणार भारताचे दोन संघ
सध्या जगभरात कोरोनाचे संकट आले असल्याने क्रिकेटजगतावर ही त्याचा परिणाम दिसून येत आहे. भारताचा प्रमुख संघ इंग्लंडमध्ये असल्या कारणाने शिखर धवनच्या नेतृत्वात आणखी एक संघ मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. १३ जुलै पासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात तीन वनडे व तीन टी२० सामने खेळले जातील. सर्व सामने हे कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया.
महत्त्वाच्या बातम्या –
रॉस टेलर निवृत्ती घेणार का? ३७ वर्षीय फलंदाजाने दिले ‘हे’ उत्तर
Video: बिलिंग्सच्या चपळाईमुळे फलंदाज झाला अवाक्, ४० मीटरवरून केला थ्रो
भारताचे ब्रम्हास्त्र ठरतंय निकामी! इंग्लंडविरुद्ध बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूंना दिली जाऊ शकते संधी