पोर्ट ऑफ स्पेन। आज (14 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा आणि वनडे मालिकेतील शेवटचा सामना पार पडणार आहे. क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर होणाऱ्या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला खास पराक्रम करण्याची संधी आहे.
आज जर कुलदीपला 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर हा त्याचा 54 वा वनडे सामना असेल. तसेच त्याने जर आजच्या सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतले तर तो वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मागे टाकेल.
शमी सध्या वनडेत सर्वात जलद 100 विकेट् घेणारा भारतीय गोलंदाज आहे. शमीने 56 वनडे सामन्यात 100 वनडे विकेट्सचा टप्पा गाठला होता. या यादीत शमीपाठोपाठ जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 57 सामन्यात 100 वनडे विकट्सचा टप्पा पूर्ण केला होता.
सध्या कुलदीपच्या नावावर 53 वनडे सामन्यात 96 विकेट्स आहेत. त्यामुळे त्याला वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत शमी, बुमरहला मागे टाकत अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे.
तसेच वनडे क्रिकेटच्या इतिहासात जगातील एकूण गोलंदाजांमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम राशीद खानच्या नावावर आहे. राशीदने 44 सामन्यात 100 वनडे विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
#वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
56 सामने – मोहम्मद शमी
57 सामने – जसप्रीत बुमराह
59 सामने – इरफान पठाण
65 सामने – झहीर खान
67 सामने – अजीत अगरकर
68 सामने – जवागल श्रीनाथ
#वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे गोलंदाज –
44 सामने – राशीद खान
52 सामने – मिशेल स्टार्क
53 सामने – साक्लेन मुश्ताक
54 सामने – शेन बॉन्ड, मुस्तफिजूर रेहमान
55 सामने – ब्रेट ली
56 सामने – ट्रेट बोल्ट, मोहम्मद शमी
57 सामने – जसप्रीत बुमराह
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या दिवशी होणार टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा
–विराट कोहलीची माफी मागत डेल स्टेनने केली निवड समीतीवर टीका