वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (27 जुलै) बार्बाडोस येथे सुरू झाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवत वेस्ट इंडीजचा डाव केवळ 114 धावांमध्ये संपवला. फिरकीपटू कुलदीप यादव याने चार तर रवींद्र जडेजाने तीन बळी मिळवले.
कसोटी मालिकेतील विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने या सामन्यात चांगली सुरुवात केली. तिसऱ्या षटकात हार्दिकने कायले मेयर्सला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर छोटेखानी भागीदारी केल्यावर 45 धावांवर त्यांचे आणखी दोन फलंदाज बाद झाले. या परिस्थितीतून कर्णधार शाई होपने 43 धावांची खेळी करत संघाला शंभरीच्या दिशेने नेले.
एक वेळ यजमान 88 भावांवर तीन अशा स्थितीत असताना कुलदीप यादव व रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने आक्रमणाची सूत्रे हातात घेतली. दोघांनी पुढील अवघ्या 26 धावांमध्ये सात गडी बाद करत यजमान संघाचा डाव 114 धावांवर संपवला. कुलदीपने केवळ तीन षटके गोलंदाजी करताना सहा धावा देत चार जणांना तंबूचा रस्ता दाखवला. तर, जडेजाने सहा षटकात 37 धावा देऊन तिघांना बाद केले. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, हार्दिक पांड्या व मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
(Kuldeep Yadav And Jadeja Wrap Up West Indies Inning In Just 114 Runs In Barbados ODI)
महत्त्वाच्या बातम्या-
संजूला बाकावर बसवल्याने उठले वादळ! चाहते म्हणतायेत, ‘मुंबई आणि उत्तर भारतीय लॉबी…’
“टीम इंडियाला रोहित-विराटची गरज नाही”, श्रीलंकेच्या दिग्गजाचे मोठे वक्तव्य