सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 188 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या विजयात फिरकीपटू कुलदीप यादव याची महत्वाची भुमिका होती. त्याने बांगलादेशच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या. त्याच्या या प्रदर्शनामुळे त्याला सामनावीरीचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीराचा पुरस्कार मिळवताच तो एका विशेष यादीत जोडला गेला आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय फिरकीपटूंच्या यादीत त्याचा समावेश झाला.
क्रिकेटच्या सर्व प्रकारात सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय फिरकीपटूंच्या यादीत 5 गोलंदाजांचा समावेश आहे. हरभजन सिंग (Harbhajan Singh), आर अश्विन (R Ashwin), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्शर पटेल (Axar Patel) या खेळाडूंनी टी20, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. आता या यादीत कुलदीप यादव याचाही समावेश झाला आहे. कुलदीपने बांगालादेशच्या पहिल्या डावात 5 विकेट हॉल पूर्ण केला होता. यजमानांच्या दुसऱ्या डावात त्याने महत्वाच्या 3 विकेट घेतल्या, यामध्ये लिटन दास (Litton Das) आणि शाकिब अल हसन (Shakib Al hasan) या महत्वाच्या खेळाडूंच्या विकेट देखील होत्या. कुलदीपने याआधी आंतरराष्ट्रीय टी20 आणि एकदिवसीय सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.
भारत आणि बांगलादेश या संघात चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 188 धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या, तर दुसरा डाव 258 धावांवर घोषीत केला. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांंवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात त्यांच्या समोर विजयासाठी 513 धावांचे आव्हान होत. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना 324 धावा करता आल्या आणि बांगलादेशला 188 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतासाठी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने चांगली कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात 90 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात शतक झळकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध बांगलादेशची नेहमीच ‘कसोटी’, हरलेल्या सामन्यांची आकडेवारी धक्कादायक
यजमान पुण्याची उपांत्य फेरीत धडक – गतविजेत्या कोल्हापूर, उपविजेत्या नागपूर, मुंबईचीही आगेकूच