हॉंगकॉंगने भारताला विजयासाठी संघर्ष करायला लावला कारण भारतीय संघाने त्यांना कमी लेखण्याची चूक केली. त्याच्या परिणाम स्वरूप हॉंगकॉंगच्या सलामीच्या फलंदाजांनी 174 धावांची भागीदारी केली. कुलपदीप यादवने हॉंगकॉंगचा कर्णधार अंशुमन राठला बाद करून ही जोडी फोडली. कुलदीपची ही या सामन्यातील एकमेव विकेट होती.
परंतु या रोमहर्षक झालेल्या सामन्यात कुलदीप यादवने दशकातील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. कुलदीपने या सामन्यात 50 बळींची संख्या त्याने पूर्ण केली आहे तेही फक्त 24 सामन्यात आणि 22 डावात.
कुलदीपने केले हे खास विक्रम-
# आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वात कमी सामन्यात 50 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा हसन अली आणि आँस्ट्रेलियाचा डेनिस लिली यांच्यासह 3 स्थानावर आहे.
अजंता मेंडिस -19
अजित आगरकर आणि मिचेल मॅग्लैघन -23
कुलदीप यादव, डेनिस लिली, हसन अली- 24
# भारताकडून सर्वात कमी सामन्यात 50 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
अजित आगरकर – 23
कुलदीप यादव – 24
# आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी सामन्यात 50 विकेट घेणाऱ्या स्पिनर गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव हा अजंता मेंडिस (19 सामने) नंतर दुसराच खेळाडू ठरला आहे.
# आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी सामन्यात 50 विकेट घेणाऱ्या डावखुऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव हा मिचेल मॅग्लैघन (23 समाने) नंतर दुसराच गोलंदाज ठरला आहे.
# आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी डावात 50 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 22 डावात हा पराक्रम केला तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या अजंता मेंडिसने 18 डावात ही कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: शिखर धवनचा विक्रमांचा सिलसिला सुरूच
–एशिया कप २०१८: भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानला सुरुवातीलाच दिले दोन धक्के