fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एशिया कप २०१८: भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानला सुरुवातीलाच दिले दोन धक्के

दुबई। एशिया कप 2018 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आज सामना सुरु आहे. या सामन्यात सुरुवातीलाच पाकिस्तानला दोन धक्के बसले आहेत.

त्यांचे फकार जमान आणि इमाम उल हक हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले आहेत. या दोघांनाही भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारने बाद केले.

इमाम डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीकडे झेल देत 2 धावा करुन बाद झाला. तर फकारला भोपळाही फोडता आला नाही. त्याला भुवनेश्नरने पाचव्या षटकात बाद केले. फकारचा झेल युजवेंद्र चहलने घेतला.

तसेच आत्तापर्यंत 11 वनडे सामने खेळणारा इमाम तिसऱ्यांदा 2 धावांवर बाद झाला आहे. तर एशिया कपमध्ये एका सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळून शून्यावर बाद होणारा फकार हा दुसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज आहे.

फकारने या सामन्यात 9 चेंडू खेळले होते, पण तो त्यानंतर शून्य धावांवर बाद झाला. या यादीत अव्वल क्रमांकावर असलेले बांगलादेशचे सलामीवीर हरुनुर राशीद हे 1988 मध्ये भारताविरुद्ध 14 चेंडू खेळून शून्यावर बाद झाले होते.

आजच्या सामन्यात इमाम आणि फकार बाद झाल्यानंतर पाकिस्तानकडून बाबर आझम आणि शोएब मलिक फलंदाजी करण्यासाठी आले आहेत.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचे पुनरागमन झाले आहे. तर नवोदीत खेळाडू खलील अहमद आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला वगळण्यात आले आहे.

तसेच पाकिस्तानने 11 जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी हाँग काँग विरुद्ध खेळवलेला संघच कायम ठेवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एशिया कप २०१८: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे टीम इंडिया

एशिया कप २०१८: भारत विरुद्ध पाकिस्तान – आज चुकीला माफी नाही

एशिया कप २०१८: केवळ 16 तासात टीम इंडिया खेळणार दुसरा आंतरराष्ट्रीय सामना

 

You might also like