मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी गेल्या एक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भारतीय संघाला त्याची उणीव जाणवत आहे. धोनीच्या गैरहजेरीत रिषभ पंत आणि केअर राहुल यष्टीरक्षकाची भूमिका बजावत आहे. दरम्यान, भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव याला धोनीची आठवण येत आहे. नुकतेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत कुलदीपने धोनीची कमतरता जाणवत असल्याचे सांगितले आहे.
धोनी संघात नसल्याने कुलदीप यादवच्या परफॉर्मन्समध्ये सातत्य दिसून येत नाही. तसेच कुलदीपमध्ये आत्मविश्वास कमी दिसून येत आहे. आयपीएलच्या माध्यमातून धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र, कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या ‘क्रिकेट बाजी’या कार्यक्रमात कुलदीप यादव, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक दीप दासगुप्ता यांच्याशी बोलताना म्हणाला की, “विकेट पाठीमागे थांबून धोनी गोलंदाजांना चार गोष्टी सांगायचा. त्यामुळे गोलंदाजी करताना मदत व्हायची. मी माझ्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केलो तेव्हा खेळपट्टीचे रंगरूप लवकर ओळखता येत नव्हते. धोनीसोबत क्रिकेट खेळताना मी या गोष्टी शिकून घेतलो. चेंडू कुठे टाकायचा हे देखील धोनी सांगतो. क्षेत्ररक्षण लावण्यात देखील तो माहीर होता. फलंदाज नेमका कोणत्या ठिकाणी शॉट खेळणार आहे, त्यानुसार तो क्षेत्ररक्षण लावत होता. यामुळे गोलंदाजांना अधिक आत्मविश्वास मिळायचा.”
“ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स यांच्यावर अंकुश ठेवणे अवघड असल्याचे देखील कुलदीप यादवने सांगितले. तो म्हणाला, ” स्मिथ बॅकफूटवर खेळणे पसंत करतो. तसेच लेट खेळत असल्यामुळे त्याला गोलंदाजी करणे नेहमीच आव्हानात्मक आहे. वनडेमध्ये एबी डीव्हिलियर्स सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याचा खेळण्याचा अंदाजही वेगळा आहे. तो आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. जी चांगली गोष्ट आहे. या दोघांशिवाय मला कोणत्याही फलंदाजांपासून भीती वाटत नाही,” असे कुलदीप यादवने सांगितले.
तो म्हणाला, “मागील विश्वचषकाला जाण्यापूर्वी मी खूप तयारी केली होतो. मी जास्त विकेट घेऊ शकला नाही. पण विश्वचषकात चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मी सतत संघात आत बाहेर होत राहिलो. सतत खेळत नसल्याने आपल्यावर दबाव येत असतो. माझ्या गोलंदाजीत देखील थोडी कमतरता आली होती.”
“युजवेंद्र चहल एका मोठया भावासारखा आहे. मैदानात व मैदानाच्या बाहेर देखील तो मला सतत सल्ले देत असतो. आमच्या दोघांत कोणतीही स्पर्धा नाही. मागील वर्षी दोघांपैकी एकालाच खेळण्याची संधी मिळायची. आम्ही ताळमेळ ठेवून चांगली गोलंदाजी करायचो. एमएस धोनी आम्हांला सतत मदत करायचा,”असे कुलदीप यादवने सांगितले.