---Advertisement---

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा भारतीय खेळाडू रणजी सामना खेळणार, फिटनेसवर असणार नजरा

On: गुरूवार, जानेवारी 30, 2025 7:46 AM
---Advertisement---

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संघाचा भाग असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंच्या फॉर्मबद्दल चिंतेचा विषय आहे. यासोबतच असेही काही खेळाडू आहेत, ज्यांच्या फिटनेसवरही सर्वांचे लक्ष असेल. यामध्ये एक नाव कुलदीप यादवचे देखील आहे. जो दुखापतीमुळे गेल्या 4 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटपासून दूर आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो 2024-25 च्या रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून खेळणार आहे. ज्यात त्याची फिटनेस सिद्ध होऊ शकते.

काल 29 जानेवारी रोजी, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने मध्य प्रदेश विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी संघाची घोषणा केली. ज्यामध्ये कुलदीप यादवचे नाव देखील समाविष्ट होते. दोन्ही संघांमधील हा सामना आज 30 जानेवारीपासून इंदाैरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाईल. ऑक्टोबर 2024 पासून कुलदीपने कोणताही सामना खेळलेला नाही. ज्यामध्ये तो शेवटचा सामना गेल्या वर्षीच्या कसोटी मालिकेत बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. कुलदीपला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळेत. ज्यामध्ये तो त्याची तयारी आणखी मजबूत करू शकेल.

आज 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी 2024-25 सामन्यांमध्ये, कुलदीप यादव उत्तर प्रदेशकडून, विराट कोहली दिल्लीकडून आणि केएल राहुल कर्नाटककडून खेळताना दिसतील. बऱ्याच काळानंतर रणजी ट्रॉफीमध्ये सामना खेळणाऱ्या कोहलीबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत.

मध्य प्रदेश विरुद्धच्या रणजी सामन्यासाठी उत्तर प्रदेश संघ

आर्यन जुयाल (कर्णधार, यष्टिरक्षक), करण शर्मा, अभिषेक गोस्वामी, माधव कौशिक, प्रियम गर्ग, ऋतुराज शर्मा, आदित्य शर्मा (यष्टिरक्षक), शिवम मावी, सौरभ कुमार, शिवम शर्मा, कृतज्ञ कुमार सिंग, विजय कुमार, अटल बिहारी राय, वैभव चौधरी, झीशान अन्सारी, कार्तिकेय जयस्वाल, कार्तिक त्यागी, कुलदीप यादव

हेही वाचा-

SL VS AUS: स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी, दिग्गज गावस्करांचा महान विक्रम मोडीत
IND vs ENG: हार्दिक पांड्याची ती चूक पडली महागात, नाही तर सामन्याचा निकाल वेगळा असता?
आयसीसी रँकिंगमध्ये मोठी उलथापालथ, तिलक वर्मा-वरुण चक्रवर्तीला बंपर फायदा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---